महावसूली आता ३०० कोटीवर? अनिल परब यांच्यावर मनसेचा प्रहार

गृहमंत्री वळसे पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का?
Anil Parab
Anil ParabGoogle
Updated on

मुंबई: परिवहन विभागातील एका निलंबित अधिकाऱ्याने नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) आणि काही अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराचा आरोप करणारी (corruption charges) तक्रार नोंदवली आहे. (Mns sandeep deshpande slam transport minister anil parab over corruption charges)

गजेंद्र पाटील यांनी १६ मे रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. गजेंद्र पाटील हे नाशिक येथे मोटार वाहन निरिक्षक होते. पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी आता या तक्रारीची दखल घेत, सखोल चौकशी करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांना दिले आहेत.

Anil Parab
नात्याला कलंक, पुतण्यानेच काकीवर केला बलात्कार

काय आहे तक्रारीत ?

उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे परिवहन विभागाच्या राज्यभरातील बदल्या मॅनेज करतात, त्यासाठी कसे अर्थपूर्ण व्यवहार चालतात, त्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे बजरंग खरमाटेना संरक्षण देतात, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Anil Parab
मुंबईत परदेशी शिक्षणासाठी जाणार्‍या मुलांसाठी वॉक-इन लसीकरण

मनसेचा निशाणा

गजेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीचा आधार घेत मनसे नेते संदीप देशपांड यांनी अनिल परब यांना लक्ष्य केले आहे. १०० कोटी महावसूली आता ३०० कोटीवर ? असा सवाल केला आहे. गृहमंत्री वळसे पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का? असा सवाल विचारला आहे. यापूर्वी सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करण्यात आला होता. त्या प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपामुळे देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()