मनसेच्या Video नंतर विश्वास नांगरे-पाटलांनी लिहिलं पत्र

मनसेच्या Video नंतर विश्वास नांगरे-पाटलांनी लिहिलं पत्र सर्व परिमंडळीय उप आयुक्तांची केली कानउघाडणी MNS Sandeep Deshpande Video of Shops timing goes Viral Police Vishwas Nangare Patil pens down letter
मनसेच्या Video नंतर विश्वास नांगरे-पाटलांनी लिहिलं पत्र
Updated on

सर्व परिमंडळीय उप आयुक्तांची केली कानउघाडणी

मुंबई: मनसेचे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटरवरून एक व्हिडीओ पोस्ट केला होता. मुंबईत सध्या तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने चारपर्यंतच उघडी ठेवण्याची परवानगी आहे. पण मनसेच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील दुकाने ही चारनंतरदेखील सर्रास उघडी ठेवली जात आहेत. बारपाठोपाठ आता दुकानदारांकडूनही वसूली केली जात असून त्याचं एक रेटकार्डही असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. मोठ्या दुकानांकडून ५ हजार , मध्यम दुकानांकडून २ हजार तर छोट्या दुकानांमधून १ हजाराची वसूली केली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. याची गंभीर दखल घेत मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सर्व परिमंडळीय उप आयुक्तांना पत्र लिहून कानउघाडणी केली. (MNS Sandeep Deshpande Video of Shops timing goes Viral Police Vishwas Nangare Patil pens down letter)

मनसेने ट्वीट केलेला व्हिडीओ-

मनसेच्या Video नंतर विश्वास नांगरे-पाटलांनी लिहिलं पत्र
मुंबईत बारपाठोपाठ दुकानदारांकडूनही वसुली? मनसेनं सांगितला 'रेट'

'कोविड-१९'च्या अनुषंगाने लागू झालेले निर्बंधांची अंमलबजावणी करण्याबाबत विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रात लिहिले आहे की...

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यामात Video शेअर करुन मुंबई शहरात दुकानदारांकडून ठराविक रक्कम घेवून वेळेची मर्यादा संपल्यानंतर दुकाने उघडी ठेवली जातात असे म्हटले आहे. ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलीन होवू शकते. कोविड-१९ च्या अनुषंगाने लागू झालेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून आम्ही यापूर्वीही वेळोवेळी लेखी स्वरुपात व प्रत्यक्षात आदेश दिलेले आहेत असे असतांना देखील आपल्याकडून कोविड-१९ च्या नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात नाही असे दिसून येत आहे.

आपल्या कार्यक्षेत्रात कोविड-१९च्या अनुषंगाने लागू झालेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. आपल्या कार्यक्षेत्रात अशा स्वरुपाचे प्रकार होणार नाहीत याची आपण स्वतः खात्री करावी. याबाबत अधिनस्त अधिकारी व अमलदार यांनादेखील अवगत करण्यात यावे. कोविड-१९ च्या अनुषंगाने लागू असलेल्या निर्बंधांची अमलबजावणी करतांना गोलोमाफटून गैरप्रकार होत असल्याचे दिसून आल्यास त्याचेवर कठोर स्वरुपाची शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

Vishwas Nangare Patil Letter
Vishwas Nangare Patil Letter
मनसेच्या Video नंतर विश्वास नांगरे-पाटलांनी लिहिलं पत्र
"सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊतजी..."; चित्रा वाघ यांची टीका

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच देशपांडे यांनी लॉकडाउनवरून सरकार आणि विरोधकांना लक्ष्य केलं होतं. केवळ विरोध दर्शवून गोष्टींची उत्तर मिळू शकत नाहीत. प्रश्नांची उत्तर मागण्यासाठी विरोधी पक्षाने जाब विचारायला हवा. लोकांच्या अनेक समस्या आहेत पण त्याबद्दल सत्ताधारी आणि विरोधक बोलले नाहीत. त्याउलट विधीमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधकांनी बाहेर आपली वेगळी विधानसभा भरवली आणि आपले विषय पुढे रेटले. हे चुकीचे आहे, अशा आशयाचे ट्वीट करत देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.