"सत्ताधाऱ्यांकडे इच्छाशक्ती नाही, आपणच समुद्र किनारे स्वच्छ ठेवूया"

अमित ठाकरे यांचा टोला
Amit Thackeray
Amit Thackeraysakal media
Updated on

मुंबई : "परदेशातील समुद्र किनारे (Beach in Abroad) स्वच्छ, चकाचक असू शकतात, मग आपले समुद्रकिनारे गलिच्छ, बकाल का असतात?" असा सवाल मनसे नेते अमित ठाकरे (MNS Amit Thackeray) यांनी उपस्थित केला. "सत्ताधाऱ्यांकडे इच्छाशक्ती नाही, आपणच आपले समुद किनारे स्वच्छ ठेवूया असा टोलाही त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे नाव न घेता लगावला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 'समुद्र किनारा स्वच्छता मोहिमे'वेळी (sea cleaning campaign) ते बोलत होते.

Amit Thackeray
मुंबईला दिलासा; कोरोनाच्या शून्य मृत्यूची नोंद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या 'समुद्र किनारा स्वच्छता मोहिमे'ला आज सगळीकडे भरभरून प्रतिसाद लाभला. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील 40 समुद्र किनाऱ्यांवर हजारो नागरिकांनी सक्रिय सहभाग घेत 'आपले' समुद्र किनारे प्लॅस्टिकमुक्त तसंच कचरामुक्त केले. यावेळी त्यांनी आपल्या मोहिमे'त सहभागी होण्याचं आवाहन सर्वांना केलं.

शनिवारी सकाळी 11 वाजता अमित ठाकरे आपली आई शर्मिला ठाकरे यांच्या समवेत दादर समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. दादर समुद्र किनाऱ्यावर चार हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. त्यांमध्ये अपंग बांधवांचाही समावेश होता."गेली 25 वर्षं जे सत्तेत आहेत, ते साधे समुद्र किनारे स्वच्छ करू शकले नाहीत. दुर्दैवाने, असं काही करण्याची इच्छशक्तीच त्यांच्याकडे नाही. म्हणूनच माझं आता लोकांनाच आवाहन आहे की, आपले समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपणच आपल्या हातात घेऊया" असं मत ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.यावेळी मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार, मनसे पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेल्या समुद्र किनाऱ्यांची नावं : गिरगाव, प्रभादेवी-दादर, माहिम, वांद्रे, वर्सोवा, जुहू, आक्सा, दानापानी, उत्तन, वेलंकनी, डहाणू, नांदगाव, केळवा, अर्नाळा, कळंब, नायगाव- सुरुची, चिंचणी, शिरगाव, नागाव, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, मुरुड, किहिम, अलिबाग, उरण, आवास, सासवणे, मुरुड- हर्णे, आंजर्ले, गणपतीपुळे, मांडवी, गुहागर, सागरेश्वर- वेंगुर्ला, शिरोडा, कुणकेश्वर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.