MNS vs Shivsena: ठाण्यात आमना सामना तर कल्याणमध्ये एकत्र,चर्चांना एकच उधाण

MNS vs Shivsena: ठाण्यात आमना सामना तर कल्याणमध्ये एकत्र,चर्चांना एकच उधाण
Updated on

Dombivali News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध मनसे पक्ष असे वातावरण तापलेले दिसत असताना कल्याण ग्रामीण मध्ये मात्र दोन्ही पक्षाचे आजी माजी आमदार ग्रामस्थांच्या प्रश्नांसाठी एकत्र आल्याचे दिसून आले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आले आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेचे आमदार राजू पाटील यांची ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या सोबत कडवी लढत होण्याची चिन्हे आहेत. त्याआधी हे आमदार एकत्र आल्याने भविष्यात नेमक्या काय हालचाली येथे होतात ते पहावे लागेल.

MNS vs Shivsena: ठाण्यात आमना सामना तर कल्याणमध्ये एकत्र,चर्चांना एकच उधाण
नारायण राणेंच्या विजयात मनसेचा महत्त्वाचा वाटा

27 गावातील सफाई कामगारांना केडीएमसीत समाविष्ट करुन घेण्यासाठी केडीएमसी मुख्यालयावर सफाई कामगारांनी सोमवारी मोर्चा काढला. 27 गाव महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करावे. अशी मागमी 2015 सालाापासून केली जात आहे. मात्र जवळपास 500 सफाई कामगारांना महापालिकेने अद्याप सेवेत समाविष्ट करुन घेतलेले नाही. त्या विरोधात आज सफाई कामगारांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.

या मोर्चाला कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांसह काँग्रेसचे नेते संतोष केने यांनी पाठिंबा दर्शवित मोर्चात सहभागी झाले. लवकरात लवकर सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेत समावून घेतले पाहिजे असे विधान माजी आमदार सुभाष भोईर यांनी केले. तर सर्व प्रकारचे कर भरुन देखील आमच्या 27 गावांवर महापालिकेकडून सातत्याने अन्याय सुरु आहे. कामगारांच्या आंदोलनास पाठिंबा देण्याकरीता मी आंदोलनात सहभागी झालो असल्याची प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

MNS vs Shivsena: ठाण्यात आमना सामना तर कल्याणमध्ये एकत्र,चर्चांना एकच उधाण
MNS Reply to UBT: "उबाठा सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार"; बीडमधील राड्यानंतर मनसे आक्रमक

शिवसेनेा ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माहिती दिली की, 12 एप्रिल 2017 साली सरकारकडे मागणी केली. त्यानंतर 2019 सालीही हा विषय सरकारकडे मांडला होता. तत्काल राज्यमंत्री योगेंद्र सागर यांच्याकडे मागणी केली होती. या कामगारांना केडीएमसी समावून घ्यावे अशी मागणी केली आहे.

या बाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील या आंदोलनास जाहिर पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत त्यांना मनसे पाठिंबा आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. 27 गावातील नागरीकांकडून कर वसूली केली जाते. त्यांना कोणत्या सोयी सुविधा पुरविल्या जात नाही. त्यांचे प्रश्न सोडविले जात नाही. 27 गावांवर सातत्याने अन्याय होत राहिला आहे. सफाई कामगारांची मागणी लवकर मान्य करा असे सांगितले.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर हे उमेदवारीचे प्रमुख दावेदार आहेत. तर मनसे पक्षाकडून आमदार राजू पाटील हे प्रमुख दावेदार आहेत. सुभाष भोईर हे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून आज मोर्चात ते सहभागी झाले आहेत. या दोन्ही उमेदवारांत कडवी लढत होण्याची शक्यता आहे.

ठाण्यात ठाकरे गट व मनसे यांच्यात वाद उफाळून आला असताना कल्याण ग्रामीण मध्ये मात्र ग्रामस्थांच्या मागण्यांसाठी ते एकत्र आले यामुळे पुढे राजकीय वातावरण कोणते वळण घेते हे पहावे लागेल.

MNS vs Shivsena: ठाण्यात आमना सामना तर कल्याणमध्ये एकत्र,चर्चांना एकच उधाण
MNS Dilip Dhotre: मनसेच्या स्थापनेपासून सोबत... राज ठाकरेंचे कट्टर समर्थक दिलीप धोत्रे कोण? पंढरपुरमधून मिळालीये उमेदवारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.