मनसेचा सत्ताधारी शिवसनेला इशारा; अद्यापही ठाण्यात मालमत्ता करमाफी का नाही?

मनसेचा सत्ताधारी शिवसनेला इशारा; अद्यापही ठाण्यात मालमत्ता करमाफी का नाही?
Updated on


ठाणे ः सत्तेवर येताना सत्ताधारी शिवसेनेच्यावतीने अनेक आश्वासने देण्यात आली होती. परंतु त्याची पूर्तता करण्याच्या ऐवजी केवळ आश्वासनांची खैरात केली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच याचा जाब विचारण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला आहे.

येत्या आठ दिवसांत किमान पाचशे फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्यात आली नाही, तर सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी मनसेतर्फे पुढच्या गुरुवारी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला.
शिवसेनेने ठाणे शहरासाठी स्वतंत्र धरण बांधण्याचे आश्वासन देण्यात आले होते. व्यापारी , व्यावसायिक , उद्योजकांना घनकचरा व्यवस्थापन कर माफ करण्यात येणार होता. ठाणे शहरासाठी तीस एकरावर मध्यवर्ती उद्यान उभारण्यात येणार होते. वाहतूककोंडीतून ठाणेकरांची सुटका होण्यासाठी जलवाहतूक प्रकल्प राबविण्यात येणार होता. अशी इतरही अनेक आश्वासने देण्यांत आली. परंतु आजतागायत यातील एकही आश्वासनाचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर झालेलं नाही. आणखी किती वर्षे ठाणेकरांना फसवी , भावनिक आश्वासने देणार असा प्रश्न मनसेच्या वतीने व्यक्त विचारण्यात आला आहे.

शिवसेनेचा ठाणेकरांशी कृतघ्नपणा! 
आर्थिक अडचणीत असलेल्या ठाणेकरांना मालमत्ता कर व पाणीपट्टीतून सवलत देण्यास नकार देणाऱ्या शिवसेनेने तब्बल पंचवीस वर्ष ठाणे शहराची सत्ता भोगून झाल्यावर ठाणेकरांशी कृतघ्नपणा केला आहे, अशी टीका भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केली आहे. कर्नाटकमध्ये भाजप सरकारने रिक्षाचालक-टॅक्सीचालकांना पाच हजारांची मदत दिली. त्यावरून महापौर नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कर्नाटकचे उदाहरण दाखविणार का, असा सवालही त्यांनी केला आहे.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.