Mumbai Latest News: दक्षिण मुंबईतील एका शाळेच्या छतावरील मोबाईल टॉवरमुळे विद्यार्थी तसेच रहिवाशांच्या जीवाला धोका आहे. तसेच, शाळा, कॉलेजच्या इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्यास मनाई असल्याने तत्काळ कारवाईचे निर्देश उच्च न्यायालयाने संबंधित कंपनीला दिले आहेत.
मोबाईल टॉवर्स उभारण्यासंबंधी २०१३च्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाळा, कॉलेज व रुग्णालये इमारतींच्या टेरेसवर मोबाईल टॉवर उभारण्यास बंदी आहे. असे असताना डोंगरी परिसरातील एका शाळेच्या टेरेसवर एका मोबाईल कंपनीने टॉवर उभारला आहे.
याविरोधात कैसर-ए-अमीन बिल्डिंग टेनंट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ॲड. विश्वनाथ पाटील, ॲड. अक्षय नायडू आणि ॲड. केदार न्हावकर यांच्यामार्फत दाखल याचिकेवर न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी पालिकेने मोबाईल टॉवर्स उभारणीसाठीच्या २१ जानेवारी २०१३ रोजी सुधारित मार्गदर्शक तत्त्वानुसार घरमालकांची संमती घेणे बंधनकारक आहे.
तसेच, शाळा- कॉलेजच्या इमारतींच्या छतावर टॉवर उभारणीवर बंदी असल्याचा युक्तिवाद रहिवाशांतर्फे करण्यात आला. त्याची दखल घेत खंडपीठाने तत्काळ टॉवर हटवण्याचे निर्देश दिले. तसेच, गरज पडल्यास पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई करावी, असे निर्देशही दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.