अरे बापरे ! "जून आणि जुलैमध्ये येणार कोरोनाची मोठी लाट"

अरे बापरे ! "जून आणि जुलैमध्ये येणार कोरोनाची मोठी लाट"
Updated on

मुंबई: आज संपूर्ण जग कोरोनाच्या महाभयंकर अशा संकटाचा सामना करत आहे. देशातही कोरोनाग्रस्तांचा आकडा ५३ हजारांच्या वर जाऊन पोहोचला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. हा आकडा कमी होण्याची चिन्हं कुठेही दिसत नाहीयेत. अशातच एम्सच्या अधीक्षकांनी एक चिंताजनक इशारा दिलाय.

देशात एक नाही दोन नाही तर आता तिसरा लॉकडाऊन सुरु आहे. मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हे सगळं कधी संपणार असा प्रश्न सध्या प्रत्येकाच्याच मनात निर्माण झाला आहे. मे नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल असं बहुतांश लोकांना वाटत होतं. तशी आकडेवारी, गणितीय ठोकताळे मांडले गेलेत. मात्र दररोज रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ कमी होताना दिसत नाहीये.

अशातच एम्सचे अधीक्षक रणदीप गुलेरिया यांनी एक चिंताजनक इशारा दिला आहे. येत्या जुन जुलैमध्ये कोरोनाची लाट येणार आहे, म्हणजेच कोरोनाचा धोका अधिक वाढणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. जगभरातल्या देशांच्या तुलनेत भारतात सध्या कमी  रुग्ण आहेत. मात्र जून आणि जुलै महिन्यांमध्ये कोरोनच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते असा त्यांनी म्हंटलंय.

"मॉडेलिंग डेटाच्या अनुसार देशातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जुन जुलैमध्ये कोरोनाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काही स्टेजेसचा वेळेनुसारच आपल्याल अंदाज येईल", असंही रणदीप गुलेरिया य़ांनी म्हंटलंय.

सध्या भारतात सध्या कोरोनाचे ५३ हजारांच्या रुग्ण आहेत. देशात १६०० च्या वर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. त्यामुळे आता एम्सच्या अधीक्षकांनी दिलेला इशारा खरा ठरतो का आणि ठरला तर सरकार यावर काय उपाययोजना करतं हे बघणं महत्वाचं असणार आहे.

modeling data and way cases are increasing it is likely that peak can come in June July

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.