Latest Ulhasnagar News: संततधार पावसाने उल्हासनगरातील रस्त्यांची खड्यांमूळे चाळण झाली आहे.त्यावर मात करण्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली असून उकडत्या डांबरातून खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी प्रमुख चौक व मुख्य रस्ते खड्डेमुक्त करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता तरुण शेवकानी यांनी दिली.
पावसाळ्यात रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते असे चित्र दरवर्षीचे असते.खड्यांमुळे अनेकदा दुचाकी स्वारांच्या पडण्याच्या घटना घडल्या असून चारचाकी वाहनांची चाके खड्यात फसल्याचे प्रसंग घडले आहेत.महानगरपालिकेने खड्यात खडी टाकण्याचे काम केले खरे.
मात्र पावसाळ्यात जोरदार पाऊस पडल्यावर या रस्त्यांवरील खडी सुध्दा विखरून गेल्याचे चित्र दिसून आले आहे.त्यामुळे गणपती बाप्पाचे आगमन खड्यांतूनच होणार आहे का?असा प्रश्न निर्माण झाला होता.
हा प्रकार आयुक्त डॉ.अझीझ शेख यांनी गांभीर्याने घेऊन मास्टिक अस्पालट या आधुनिक टेक्नॉलॉजीने खड्डे बुजवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.त्यानुसार अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता तरुण शेवकानी यांनी मास्टिक अस्पालटने काम करण्यास सुरुवात केली आहे.
मास्टिक हा डांबरचा प्रकार असून 200 डिग्री मध्ये डांबर उकडून खडीवर ते चार थरात रस्त्यावरील खड्यात टाकले जाते.त्यामुळे डांबराचा थर घट्ट होऊन तो वॉटर प्रुफ होतो.मास्टिकमुळे अवघ्या दोन तासात वाहने रस्त्यावरून धावणार असून ते उखडणार नाही.
हे काम प्रेम झा यांच्या झोपी कंपनीला देण्यात आले असून धोबीघाट परिसरातून कामाची सुरुवात करण्यात आली आहे.यावेळी कंपनीचे प्रतिनिधी स्वप्निल,सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता तरुण शेवकानी,कनिष्ठ अभियंता हर्षद प्रधान,कंपनीचे प्रतिनिधी स्वप्निल भोगले उपस्थित होते.यापुढे श्रीराम,नेताजी,हिराघाट,छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूल सह मुख्य रस्त्यांचे आणि कृत्रिम तलावांचे मार्गांचे काम केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.