नवी मुंबई : देशातील समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी जगासमोर रडून स्वतःचे अपयश लपवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे त्यांच्या बनावटी अश्रूंमुळे जगभरात ‘पप्पू‘ ठरलेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. देशाला काँग्रेस विचारसरणीची गरज असून गांधी घराणंच देशाला चालवू शकतं. समाज माध्यमांवरील भाजपच्या पगारी कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) पप्पू ठरण्याचा प्रयत्न केला; मात्र जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डे खणतो, तेव्हा आपणच त्यात पडतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे मोदी आहेत, असे पटोले म्हणाले. ‘कॉफी विथ सकाळ' (Coffee with Sakal) या कार्यक्रमावेळी पटोले यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. (Modi has become Pappu all over the world says Nana Patole)
सध्या देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून जीडीपीमध्ये उणे ७.३ टक्के घट झाली आहे. ५० वर्षांपूर्वी देशाचा जीडीपी एवढा कमी झाला होता. म्हणजे मोदी सरकारने देशाला ५० वर्षे मागे नेले आहे. दुसरीकडे जगात कच्च्या तेलाचे दर जास्त असतानाच काँग्रेसने दरवाढ केली. मात्र, आता कच्चे तेलाचे दर घसरले असतानाही पेट्रोलने शंभरी का ओलांडली, याचा जाब विचारण्याचा अधिकार आम्हाला आहे, असेही पटोले यांनी ठणकावून सांगितले. देशात कोरोना लशीसाठी मारामार सुरू असताना स्वतःला बलशाली म्हणवणाऱ्या पंतप्रधानांनी पाकिस्तानला फुकट लस देऊन आपल्या देशातील लोकांवर लस खरेदी करण्याची वेळ आणली. हा बनाव आता लोकांच्या लक्षात येत आहे.
गेल्या वर्षी देशात कोरोनाची सुरुवात झाली, तेव्हा हा आजार देशाची अर्थव्यवस्था पोखरून काढेल, असा दावा सर्वप्रथम काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी केला होता; मात्र, त्यावेळी भाजप नेत्यांनी त्यांना वेड्यात काढलं होतं. समाज माध्यमांवर त्यांची टिंगल उडवली. पण आता खरी परिस्थिती लोकांसमोर आली आहे. त्यामुळे भाजपने केलेली फसवणूक लोकांच्या लक्षात आल्याने २०२४ च्या निवडणुकीत खोटी स्वप्ने विकणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. "भाजप सरकारने मराठा, ओबीसी आणि धनगर समाजाची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचं समाजातील सुज्ञांना कळलं आहे," असंही यावेळी नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.