मुंबई: मोहित कंबोज यांना मुंबई महापालिकेची नोटीस आली आहे. नारायण राणे यांच्या घराची पाहणी केल्यानंतर आता पालिकेच्या निशाणावर मोहित कंबोज आहेत, असं दिसतंय. उद्या पालिकेचे अधिकारी मोहित कंबोज यांच्या घराची तपासणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. मोहित कंबोज यांच्या घरात काही अनधिकृत बांधकाम झालंय का याची तपासणी महापालिकेचे अधिकारी करणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून मोहित कंबोज नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर टीका करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर होत असलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मात्र, या तपासणीच्या नोटीशीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोहित कंबोज यांनी म्हटलंय की, काहीही करा मी झुकणार नाही.
काय म्हणाले मोहित कंबोज?
मोहित कंबोज यांनी म्हटलंय की, काही खोटी केस माझ्याविरोधात होऊ शकली नाही म्हणून माझ्या घरी आज मुंबई महापालिकेची नोटीस पाठवण्यात आली आहे. कंगना रणौत असो वा नारायण राणे... जर काही वाकडं करु शकले नाही तर घरच तोडून टाकण्याची कृती! काही हरकत नाही. हे देखील ठिक आहे. मात्र, काहीही करा, महाविका आघाडी सरकार, मी तुमच्यासमोर झुकणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.