वानखेडे प्रकरणातील मोहित कंबोज राज ठाकरेंसोबत,भेटीचे फोटो व्हायरल

वानखेडे प्रकरणातील मोहित कंबोज राज ठाकरेंसोबत,भेटीचे फोटो व्हायरल
Updated on

आर्यन खान प्रकरणात मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्यावर अरोप केले होते. कार्डिलिया क्रूझ प्रकरण घडवून आणण्यात मोहित कंबोजचा (Mohit Kamboj) मोठा हात असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. या सर्व प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचं ते म्हणाले. यात सर्वात महत्वाचं म्हणजे कंबोज नावाच्या व्यक्तीचे भाजपशी असलेले संबंध स्पष्ट झाले. (Mumbai BJP)

दरम्यान, मुंबई जिल्हा बँकेच्या (Mumbai District Bank Election) निवडणुकांसाठी भाजपला मनसेचा पाठिंबा हवा आहे. यासाठी भाजपचे आमदार प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी प्रवीण दरेकरांना फोनही लावून दिला. यावेळी प्रसाद लाड (Prasad Lad) आणि राज ठाकरेंचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. मोहित कंबोज याने देखील राज ठाकरेंची भेट घेतल्याचं समोर येतंय. ठाकरे आणि लाड उभे असलेल्या ठिकाणीच मोहित कंबोजने राज ठाकरेंसोबत फोटो काढला. कंबोजने तो फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

भारतीय (कंबोज) भाजपचे पदाधिकारी?

मोहित कंबोज हे भाजप, मुंबईचे माजी सरचिटणीस आहेत. ते 2012 ते 2019 पर्यंत IBJA चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि 2013 ते 2014 पर्यंत भाजप मुंबईचे उपाध्यक्ष होते. ते 2014 मध्ये दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर उमेदवार होते.

21 सप्टेंबर 2013 रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि एका महिन्यानंतर भाजप मुंबईचे उपाध्यक्ष बनले. त्यानंतर त्यांची भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ते 2016 मध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष बनले. 16 ऑगस्ट 2019 रोजी त्यांचा युवा मोर्चाचा कार्यकाळ संपला आणि 2019 ते 2020 पर्यंत भाजप मुंबईचे सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

कोणत्या प्रकरणात किती कोटींची फसवणूक?

बँक ऑफ इंडियाची 57 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेता मोहित कंबोजसह चौघांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे.(17 जून 2020) याप्रकरणी मुंबईत पाच ठिकाणी शोध मोहिम राबवण्यात आली आहे. दरम्यान, कंबोज यांनी आरोप फेटाळून लावत आपण 'वन टाईम सेटलमेंट'अंतर्गत 30 कोटी रुपये बँकेला 2018 मध्ये भरल्याचे सांगितले.

बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून याप्रकरणी सीबीआयने मे. अव्यान ओव्हरसिज प्रा. लि.(सध्याची बाग्ला ओव्हरसिज प्रा.लि.) व त्याचे व्यवस्थापकीय संचालक मोहित कंबोज, जितेंद्र गुलशन कपूर, सिद्धांत बाग्ला, इर्तेश मिश्रा (चौघेही खासगी कंपनीचे संचालक) व केबीजे हॉटेल्स गोवा प्रा.लि. यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 2013 ते 2018 च्या दरम्यान फोर्ट येथील बँक ऑफ इंडियाच्या मिड कॉर्पोरेट ब्रांच येथे ही फसवणूक झाली. याप्रकरणी काही बँक अधिकाऱ्यांवरही संशयाची सुई आहे.

आरोपींनी कट रचून फॉरेन बिल्स निगोसिएशन, एक्सपोर्ट पॅकेजिंग क्रेडिट लिमिटच्या नावाखाली 60 कोटी रुपये मंजूर करून घेतले. ती रक्कम मंजूर करण्यासाठी तसेच मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला. तसेच त्याचा वापर दुसऱ्या कामांसाठी करण्यात आला. त्यामुळे बँकेला 57 कोटी 26 लाख रुपयचे नुकसान झाले, असा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.