मोखाडा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ; मेणबत्तीच्या प्रकाशात उपचार

Mokhada hospital
Mokhada hospitalsakal media
Updated on

मोखाडा : मोखाडा (mokhada) तालुक्यात डेंग्यु, चिकणगुणीया, मलेरिया, न्युमोनिया आणि टायफाईडचे रूग्ण आढळत आहेत. सर्व रूग्ण ऊपचारासाठी (patient treatments) ग्रामीण रूग्णालयात (hospital) दाखल होत आहे. मात्र, रूग्णालयात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे (electricity problems) रूग्णांना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना (doctors) त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. आठवडाभरापासुन येथील वैद्यकीय अधिकारी वीजपुरवठा खंडित झाल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात (candle light)  आणि मोबाईलची लाईट (mobile light) लावून रूग्णांवर उपचार करत आहे. तर प्रसुती गृहातही मेणबत्तीच्या प्रकाशात आणि मोबाईलची लाईट लावून महिलांची प्रसुती प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Mokhada hospital
शिक्षक दिनीच शिक्षकांचे मुंबई उपसंचालक कार्यालयासमोर उपोषण

 मोखाडा तालुक्यातील  90  हजार नागरीकांचे आरोग्य अवलंबून असलेल्या ग्रामीण रूग्णालयाला गैरसुविधांनी घेरले आहे. तालुक्यात डेंग्यु, चिकणगुण्या, न्युमोनिया आणि मलेरिया चे रूग्ण आढळत आहेत. त्याचा सर्व भार ग्रामीण रूग्णालयावर येत आहे. रूग्ण संख्या वाढल्याने, खाटा भरल्या आहेत. रूग्णांना खाली गादी टाकून ऊपचार दिले जात आहे. येथे विजेचा कायम लपंडाव सुरू आहे. रूग्णालयात कन्व्हर्टर आणि जनरेटरची सुविधा असतांना, त्याचा वापर न करता, चक्क मेणबत्ती च्या प्रकाशात रूग्णांवर उपचार केले जात आहेत. तर प्रसुती गृहातही मेणबत्ती च्या प्रकाशात आणि मोबाईलची लाईट लावून  महिलांची प्रसुती प्रक्रिया केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्भवती महिला आणि रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा गंभीर प्रकार आठवडाभरापासुन सुरू आहे. 

 शिवसेनेच्या दणक्याने अर्धा तासात जनरेटर झाले सुरू

शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश निकम कुपोषित बालकांची पाहणी करण्यासाठी व आपल्या मुलीच्या ऊपचासाठी रूग्णालयात गेले असता हा सारा प्रकार त्यांच्या समोर आला. मेणबत्तीच्या प्रकाशात आणि मोबाईलची लाईट लावून रूग्णांना इंजेक्शन दिले जात होते. तर प्रसुती गृहातही हाच गंभीर प्रकार दिसल्याने, निकम यांनी तातडीने वैद्यकीय अधिक्षक डाॅ महेश पाटील यांना दूरध्वनी करून धाऱ्यावर धरले.

Mokhada hospital
डोंबिवलीत 'मै हूं डॉन' च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

प्रत्येकवेळी आंदोलन केलेच पाहीजे का ? जाब विचारल्यावरच रूग्णांना सुविधा देणार का ? असे खडे बोल सुनावले. सरकार येथे सुविधा पुरवत असतांना त्याचा उपयोग का केला जात नाही असा सवाल ही त्यांनी अधिकार्यांना  विचारला. त्यानंतर अर्धा तासात रूग्णालयातील जनरेटर सुरू करण्यात आले त्यामुळे गर्भवती महिला, रूग्ण आणि कार्यरत वैद्यकीय अधिकार्यांना दिलासा मिळाला आहे. 

या घटनेबाबत वैद्यकीय अधिक्षक डाॅ महेश पाटील यांना दूरध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद होता. त्यामुळे रूग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे कन्व्हर्टर च्या बॅटर्या डाऊन झाल्या आहेत. तर जनरेटर चा फॅन नादुरुस्त असल्याने, रूग्णालयात अंधारात मेणबत्ती आणि मोबाईलची लाईट लावून ऊपचार करावे लागत आहे. एका सामाजिक संस्थेने कन्व्हर्टर दिला आहे. तो लवकरच बसविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.