मुंबई: पश्चिम उपनगर परिसरात एका महिला पोलिस शिपायाचा तिच्याच सहकाऱ्याने पाठलाग करून व संदेश पाठवून बदनामी केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी महिला पोलिस (women police) शिपाईने दिलेल्या तक्रारीनुसार सहकारी पोलिस शिपायावर विलेपार्ले (vileparle) पोलिस ठाण्यात विनयभंगाचा (molestation) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (molestation Complaint against police constable by women colleague)
ठाणे जिल्ह्यात राहणारी 26 वर्षीय महिला मुंबई पोलिस दलात सशस्ञ पोलिस दलात कार्यरत आहे. आरोपी पोलिसही याच महिलेसोबत कार्यरत आहे. ऑक्टोबर 2020 पासून एक पोलिस शिपाई या महिलेच्या मागावर होता. सुरुवातीला महिला पोलिस शिपाईने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. नेमकं याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपी शिपायाने महिला पोलिस शिपायाचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. ऐवढ्यावरच न थांबता त्याने महिलेच्या फोननंबरवर वारंवार मेसेज करू लागला. वेळोवेळी या महिलेने आरोपी पोलिस शिपायाला समज देऊन हे प्रकार थांबवण्याबाबत समजावले. मात्र आरोपी ऐकत नव्हता.
रोजच्या या त्रासाला पीडित महिला पोलिस शिपाई पूर्णतहा कंटाळली होती. त्यामुळेच सुट्टी घेऊन पीडित महिला तिच्या गावी गेली असताना, आरोपी पोलीस शिपायाने दारूच्या नशेत तिचे गाव गाठले. ऐवढ्यावरचं न थांबता पीडितेच्या गावी त्याने महिला पोलिस शिपायाबद्दल गोंधळ घालत नातेवाईंकामध्ये बदनामी केली. या संपूर्ण घटनेने संतापलेल्या महिला पोलिस शिपाईने 18 जून रोजी अखेर पोलिस ठाण्यात संबधित पोलिस शिपायाविरोधात कलम 354, 354 (ड),500 भा.द.वि कलमांसह गुन्हा नोंदवला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.