मुंबई : बोरिवली-ठाणे भुयारी मार्गाला मुहूर्त!

पालिकेकडून ३४ हेक्टरवरील आरक्षण बदलाला वेग; महासभेच्या निर्णयाकडे लक्ष
बोरिवली-ठाणे भुयारी मार्गाला मुहूर्त!
बोरिवली-ठाणे भुयारी मार्गाला मुहूर्त!sakal
Updated on

मुंबई : वेळ आणि इंधन वाचवणाऱ्या बहुचर्चित ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाचे भिजत असलेले घोंगडे मार्गी लावण्यासाठी ठाणे महापालिकेने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मार्च २०२२ मध्ये या भुयारी मार्गाच्या कामाला एमएमआरडीएकडून सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भुयारी मार्गात अडथळा ठरणारे पालिका क्षेत्रातील नियोजित रस्ते, टीएमटी, म्हाडा हाऊसिंग साईट, रहिवासी विभाग, औद्योगिक विभाग, उद्यान आरक्षण, वनस्पती व प्राणिशास्त्र पार्क यासह हरित विभागातील ३४ हेक्टरवरील आरक्षण बदलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठीचा प्रस्ताव पालिकेच्या २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला आहे.

ठाण्याहून बोरिवलीला जाण्यासाठी घोडबंदर आणि मिरारोड असा वळसा घालून प्रवास करावा लागतो. अवजड वाहतूक आणि वाहनांच्या संख्येमुळे या प्रवासासाठी एक तासांहून अधिकचा वेळ लागतो. ठाणे-बोरिवली हे अंतर अवघ्या १५ मिनिटांवर आणण्यासाठी ठाण्यातील टिकूजीनीवाडी ते बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानदरम्यान भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने पुढे आणला होता.

बोरिवली-ठाणे भुयारी मार्गाला मुहूर्त!
ठाणे : दानपेटी चोराला दोन तासांत अटक

सुरुवातीला राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे देण्यात आला असून, या विभागाने हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. ठाणे पालिकेच्या हद्दीतील घोडबंदर रोडपासून चितळसर-मानपाडा, बोरीवडे, येऊर क्षेत्रातून हा मार्ग जाणार आहे. या प्रकल्पात ठाणे महापालिकेची ३४ हेक्टर जमीन बाधित होणार आहे.

उपनगरवासीयांना फायदा

ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाचा या दोन्ही शहरांच्या उपनगरातील नागरिकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. टिकूजीनी वाडीपासून ते बोरिवलीजवळील पश्‍चिम द्रुतगती महामार्गापर्यंत ११.८ किमीच्या या भुयारी मार्गामुळे १०.५ लाख मेट्रिक टन इंधनाची बचत होणार आहे. तसेच ३६ टक्के कार्बनडाय ऑक्साईड कपात करण्यास मदत होणार असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.