भाईंदर : काळ्या जादूच्या नावाखाली महिलेची फसवणूक; अकरा जणांवर गुन्हा, एकाला अटक

crime news
crime newsSakal media
Updated on

भाईंदर : गतिमंद मुलाला काळ्या जादूद्वारे (Black Magic) बरे करण्याच्या बहाण्याने महिलेला एक कोटी ९२ लाख रुपयांना गंडा (Money fraud) घालण्यात आल्याची घटना मिरा रोड येथे घडली आहे. याप्रकरणी मिरा रोड पोलिसांनी (Mira Road Police) अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील मुख्य आरोपीला (Culprit arrested) केरळ येथून अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. मुख्य आरोपीची पीडित महिलेशी समाज माध्यमावर ओळख झाली होती.

crime news
परीक्षा निर्धारित वेळेतच घ्याव्यात; पालकांचा आंदोलनाचा पवित्रा

महिलेची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे समजल्यामुळे आरोपीने महिलेशी ओळख वाढवली आणि तिचा विश्वास संपादन केला. महिलेच्या गतिमंद असलेल्या मुलावर काळी जादू करू आणि तो चांगला होईल, असे आश्वासन आरोपीने महिलेला दिले. त्यासाठी आवश्यक असलेले विधी करण्यासाठी महिलेकडून पैसे उकळले. त्यानंतरही चांगल्या ठिकाणी लग्न लावून देण्याच्या, बंगलोर येथे भाडेतत्त्वावर हॉटेल घेऊन देण्याच्या आणि केरळमधील मलप्पुरम येथे मोठा बंगला खरेदी करून देण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेकडून दागिने आणि रोख रक्कम यांच्या रूपाने तब्बल एक कोटी ९२ हजार रुपये उकळले.

एका संशयिताला अटक

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने मिरा रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांचे एक पथक केरळला रवाना झाले आणि यातील मुख्य आरोपी बद्रुद्दीन मुनीर याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.