तबलिगी जमात प्रकरण: मुंबईतल्या 'या' चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु

तबलिगी जमात प्रकरण: मुंबईतल्या 'या' चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु
Updated on

मुंबई: दिल्लीतील तबलिगी जमात प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) मुंबईत शोध मोहिम राबवण्यात आली. मुंबईतील अंधेरीसह चार ठिकाणी ही शोध मोहिम राबवल्याचे सूत्रांनी सांगितले. तबलिगी जमातचा प्रमुख मौलाना साद याच्याविरोधात 17 एप्रिल रोजी पैशाच्या अफरातफर प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता याप्रकरणी कारवाईला वेग आला असून मुंबतही छापेमारी करण्यात येत आहे.

कोरोना संकटात दिल्लीतील तबलिगी जमातच्या मरकज कार्यक्रमानंतर गर्दी जमवून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर दिल्ली, मुंबईत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणी सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला होता. मरकजमध्ये हजारो लोक राहत होते. यावेळी त्यांच्या राहण्या खाण्यासाठी कुठून निधी दिला जात होता, मरकजमध्ये भारतातील अनेक राज्यांतून आणि परदेशातून मोठ्या संख्येने लोक आले होते. यावेळी त्याचे प्रायोजक कोण होते वा त्यांच्या प्रवासाचा खर्च कोणी व कसा दिला? याबाबींवर ईडी तपास करत आहे.

मरकज सोडल्यानंतर अनेक लोक देशातील इतर ठिकाणीही गेले होते. त्यांनी दिल्ली ते विविध भागांतील मशिदीपर्यंत प्रवास कसा केला? त्यांचा बस, हवाई वाहतूक, टॅक्सीचा खर्च कोणी केला? असेही प्रश्न ईडीकडून करण्यात येतोय. मिळालेल्या माहितीनुसार,  दैनंदिन व्यवहारात जमात रोख रकमेचा वापर करीत होते. ही रक्कम कशी मिळाली याचा ईडीकडून तपास केला जाणार आहे. तबलिगी जमातला परदेशी फंड मिळत होता का? याचाही ईडीकडून तपास केला जात आहे.

मार्च महिन्यात मरकज वसईला होणार होता. पण पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे तो पुढे दिल्लीत घेण्यात आला. पुढे हा मरकज दिल्लीत झाला. त्यावेळी कोरोना संकटामुळे लॉकडाऊन असल्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात परदेशातून आलेले तबलिगीही सामील झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवल्याचा आरोप या संघटनेवर करण्यात आला. या कार्यक्रमात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि कोरोनाचा फैलाव करणाऱ्या दिल्लीमधील निजामुद्दीन मर्कझचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर मौलाना साद फरार झाले होते.

(संपादनः पूजा विचारे)

Money Laundering case tablighi jamaat ED raid in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.