ACB : मोनोरेल चीफ ऑपरेटींग ऑफिसरने मागितली २० लाखांची लाच; गुन्हा दाखल

bribe crime
bribe crimesakal media
Updated on

मुंबई : कंत्राटदार (contractor) कंपनीकड़ून 20 लाख रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी (20 lac bribe) मोनोरेलचे चीफ ऑपरेटींग ऑफीसर डॉ. डी. एल.एन. मुर्ती यांच्याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ( Anti corruption bureau) गुन्हा दाखल केला आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनी (facility management company) असून कंपनीला मुंबई मोनोरेल प्रकल्पाअंतर्गत (monorail project) साफसफाई, हाउसकिपींग, मेंटनन्स, कस्टमर सर्व्हिसचे जानेवारी 2019 ते ऑगस्ट 2020 पर्यंतचे कंत्राट मिळाले होते.

bribe crime
माजी आमदार विवेक पाटील यांच्या 234 कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

ऑगस्ट 2020 रोजी कंत्राटाप्रमाणे काम पूर्ण केले. ठरल्याप्रमाणे कामाचे बिल 2 कोटी 10 लाख तसेच 22 लाख गॅरटी रक्कम देण्यात आली होती. त्यापैकी, 40 लाख रूपयांचे बिल आणि 11 लाख गॅरंटी रक्कम मुंबई मोनोरेलकड़े थकीत होते. मूर्ती यांनी तक्रारदार यांची फाईल स्वतःकड़े अडकवून 20 लाख रूपयांची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकड़े धाव घेतली. गेल्या महिन्यात 2 जुलै रोजी एसीबीने केलेल्या पडताळणीत मूर्ती यांनी पैसे मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, सोमवारी याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी एसीबी अधिक तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.