Monsoon Update : राज्यात पावसाचा तडाखा; आतापर्यंत अंगावर झाड पडून ४ जणांचे बळी

मालाडच्या दुर्घटनेत झाडाची फांदी एक मृत्यू, दोन जखमी
Tree
Tree Sakal
Updated on

मुंबई - मालाड येथे आज झाडाची फांदी अंगावर पडून झालेल्या दुर्घटनेत ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तीन वर्षीय मुलासह एक महिला जखमी झाल्याची घटना घडली. मुंबईत यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर पडझडीचे सत्र सुरु असून गेल्या तीन आठवड्यांत झाड अंगावर पडून होणार्‍या मृतांची संख्या चारवर गेली आहे.

मालाड पूर्व बच्चानी नगर, दफ्तरी रोड येथे एका खासगी जागेत असलेले जांभळाच्या झाडाची मोठी फांदी आज सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास दोन महिला आणि एका मुलाच्या अंगावर कोसळली. यामध्ये एका महिलेल्या डोक्याला मार लागला.

या दुर्घटनेमधील जखमींना जवळच्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झालेल्या चिदाबाई अहिरे या रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत झाला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

Tree
Doctorate Degree : डॉ. अभय बंग यांना काझीरंगा विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी जाहीर

तर रेखाबाई सोनावणे (४६) आणि रुद्र (३) सोनावणे यांच्यावर आवश्यक उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, चेंबूरमध्ये चार वर्षांपूर्वी माडाचे झाड अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू झाला होता.

या दुर्घटनेचे पडसाद तेव्हा पालिकेच्या सभागृहात उमटले होते. यावेळी नगरसेवकांनी धोकादायक झाडांबाबत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी प्रशासनाकडून ‘झाडांचा डॉक्टर’ संकल्पनेवर ‘अ‍ॅर्बोरिस्ट’ची नेमणूक करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

Tree
Monsoon मध्ये दुधाचं सेवन ठरू शकतं आरोग्यासाठी घातक, पावसाळ्यात ‘हे’ पदार्थ देखील खाणं टाळा

यामध्ये वनस्पती तज्ज्ञांकडून झाडांची पाहणी करून धोकादायक फांद्या, झाडे हटवणे शक्य होणार होते. मात्र प्रशासनाचे हे आश्वासन हवेत विरले आहे. याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

सोसायट्यांना नोटीसा

संबंधित सोसायटीमधील धोकादायक झाडे तोडण्याची मागणी करण्यात आली होती, असे स्थानिकांकडून सांगण्यात आले. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातो आहे.

Tree
Pune : बारामतीच्या अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची प्रलंबित कामे वेगाने मार्गी लावा ; जिल्हाधिकारी

संबंधित सोसायटीने पालिकेलाही धोकादायक फांद्यांच्या छाटणीबाबत कोणतेही पत्र दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, खासगी जागेमधील धोकादायक झाडे-फांद्या हटवण्यासाठी एप्रिलपासून चार हजार मालमत्ताधारक, संबंधित विभागांना नोटिसा बजावण्यात आल्याचे उद्यान विभागाकडून सांगण्यात आले.

- जून २०२१ मध्ये संपूर्ण मुंबईत एकूण २५८८ ठिकाणी झाडे-फांद्या कोसळल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या. यामध्ये २४ जण जखमी झाले होते. तर पाच जणांचा मृत्यू झाला होता.

- जून २०२२ मध्ये मुंबईत एकूण १३७४ ठिकाणी झाडे-फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये २८ जण जखमी झाले. मात्र एकही मृत्यू झाला नाही.

- ११ जुलै २०२३पर्यंत मुंबईत एकूण झाड-फांद्या कोसळल्याच्या ४३४ तक्रारी आल्या असून तीन आठवड्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.