मुंबई : पावसाळी अधिवेशन पुढे जाणार?; 'ही' असेल नवी तारीख

मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होईल अशी जोरदार चर्चा असली तरी अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही.
Vidhan Bhavan
Vidhan BhavanSakal
Updated on

मुंबई : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सकाळीच हे अधिवेशन १० ते १७ ऑगस्ट या काळात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आता ते १७ ते २६ ऑगस्ट या कळात होईल असं सांगितलं जात आहे. (Monsoon session of Maharashtra Legislature likely to go ahead)

Vidhan Bhavan
TET Scam : टीईटी घोटाळ्यात ईडीची एन्ट्री; तुकाराम सुपेंची होणार चौकशी?

पावसाळी अधिवेशन घ्यायचं असेल तर त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणं गरजेचं आहे. त्यामुळे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. पण याबाबत विरोधीपक्षांनाही निमंत्रण दिलं जात तसं निमंत्रण अद्याप आम्हाला मिळालेलं नाही, असं विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं उद्या खरंच मंत्रिमंडळ विस्तार होईल का? याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.

Vidhan Bhavan
Bhandara Rape Case : मोठी कारवाई! एक पोलीस अधिकारी, दोन कर्मचारी निलंबित

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाबाबत उद्या होणारी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार होती ती पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच अधिवेशन घेता येणार नाही, असंही बोललं जात आहे. त्यामुळं अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय.

Vidhan Bhavan
कपिल सिब्बल यांच्या SC वरील वक्तव्यावर बार असोसिएशनची तीव्र प्रतिक्रिया

सूत्रांच्या माहितीनुसार, नवं अधिवेशन १७ ते २६ ऑगस्ट या काळात होईल असं सांगितलं जात आहे. कारण उद्याचा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास प्रत्येक मंत्र्यांना आपल्या खात्याची जबाबदारी समजून घ्यावी लागणार आहे. कारण बरेचसे मंत्री नव्यानं येणार आहेत. त्यामुळं त्यांना थोडा वेळ देणं आवश्यक आहे. त्यामुळं अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.