मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज (२७ जुलै) वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त लवकर जायचं असल्याचं सांगत शिवसेनेच्या आमदारांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना आजचं कामकाज लवकर थांबवण्याची विनंती केली.
पण यावरुन शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये तू तू, मै मै पहायला मिळालं. यावेळी गोऱ्हेंनी कामकाज थांबवायला नकार दिल्यानं अनिल परब चिडले यामुळं दहा मिनिटांसाठी त्यांनी कामकाज थांबवलं होतं. (Monsoon Session Video Uddhav Thackeray birthday mess in Legislative Council of Maharashtra)
विधानपरिषदेत चर्चा सुरु असताना राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. यावेळी अचानक अनिल परब आपल्या जागेवरुन उठले आणि म्हणाले आम्ही यापूर्वी सभागृहाला विनंती केली होती की, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्यानं आम्हाला लवकरच जायचं आहे. तेव्हा सभागृहाचं आजचं कामकाज लवकर संपवण्यात यावं. (Latest Marathi News)
परब यांच्या या विनंतीवर समोरुन भाजपच्या आमदारांनी त्यांना विरोध दर्शवला. यावर अनिल परब चिडले आणि म्हणाले, सत्ताधारी पक्षाची अशी भूमिका असेल तर मग आमच्याकडून सहकाऱ्याची अपेक्षा करु नका.
यावर भाजपचे आमदार म्हणाले, "चालेल!" या उत्तरानंतर परब चिडले आणि म्हणाले, "चालेल तर मग आज म्हाडाच्या विधेयकावर आम्ही बोलणार आणि जर ते आज मंजूर झालं नाही तर त्याला आम्ही जबाबदार नाही" पण सत्ताधारी आमदारांच्या उत्तरावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, चालेल काय? असं चालणार नाही. (Marathi Tajya Batmya)
गोऱ्हे म्हणाल्या, ज्यांना काही अपरिहार्य कारणामुळं जायचं असेल तर तुम्ही उशीरा गेला तरी चालेल ते असताचं ना? शुभेच्छा तुम्हाला सभागृहातूनही देता येतील.
यावर परब म्हणाले, आम्हाला सांगा ना तुमची विनंती मान्य करता येणार नाही म्हणून? कोण दादागिरी करतंय? यानंतर वाद मिटवण्यासाठी नीलम गोऱ्हेंनाच आपल्या खुर्चीतून उठून परबांना समजावावं लागलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.