कल्याण-डोंबिवलीत पावसाची संततधार; पालिकेच्या कार्यालयासमोरच गुडघाभर पाणी, विद्यार्थ्यांना पाण्यातून करावी लागली पायपीट

कल्याण डोंबिवली परिसरात सकाळ पासून पावसाची संततधार सुरू आहे.
Heavy rain in Kalyan-Dombivli
Heavy rain in Kalyan-Dombivliesakal
Updated on
Summary

सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे त्या भागात वाहतूक संथ गतीने होऊन वाहन कोंडीची समस्या निर्माण होत होती.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाची संततधार सुरू असून आज दुपारी अनेक सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (Kalyan Dombivli Municipal Corporation) डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या समोरच गुडघाभर पाणी साचल्याने वाहन चालक, शाळकरी मुले यांना या पाण्यातून चालत जावे लागले. पाण्याचा अंदाज येत नसल्याने शाळेतील लहान मुले चालता चालता पडत होती. अखेर पालकांना त्यांना कडेवर घेऊन पाण्यातून पायपीट करावी लागली.

कल्याण डोंबिवली परिसरात सकाळ पासून पावसाची संततधार सुरू आहे. मध्येच पावसाचा जोर वाढत असल्याने कल्याण व डोंबिवलीत अनेक सखल भागात पाणी साचले. डोंबिवली स्टेशन परिसरातील भाजी मार्केट, डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान, दोन टाकी परिसर प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोरील रस्ता, तसेच कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, आधारवाडी चौक परिसर, दुर्गाडी भाग यांसह अनेक भागात गुडघाभर पाणी साचले.

Heavy rain in Kalyan-Dombivli
Karwar Collector : गोव्याला जात असाल, तर थांबा! 'हा' घाटमार्ग तीन महिन्यांसाठी राहणार बंद

रस्त्याच्या कडेला असलेली गटारे, नाले यांची सफाई योग्य न झाल्याने पहिल्याच मुसळधार पावसात पाणी साचल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. कल्याण डोंबिवली, तसेच ग्रामीण भागात गुरुवारी सकाळपासूनच पाऊस सुरु होता. पावसाच्या जोरदार सरी सुरू असल्याने काही ठिकणी पाणी साचले. मात्र, मध्येच पावसाचा जोर कमी होत असल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा होत होता. सकाळ पासून सुरू असलेला पाऊस आणि त्यात शनिवार असल्याने नागरिकांनी घरातून बाहेर न पडणे पसंत केले.

यामुळे रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे त्या भागात वाहतूक संथ गतीने होऊन वाहन कोंडीची समस्या निर्माण होत होती. कल्याण पश्चिम येथील जोशीबाग मधील रूबाब बानो या तळ अधिक एक मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील भिंत शनिवारी कोसळली. ही इमारत पूर्णतः रिकामी असून जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही. इमारतीचा धोकादायक भाग क प्रभागामार्फत काढून घेण्यात येत आहे, अशी माहिती क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com