काळजी घ्या, पावसाळी आजार आणि कोरोनाची लक्षणे सारखीच! जाणून घ्या सविस्तर

कोणताही आजार अंगावर न काढण्याचे डॉक्टरांचे आवाहन
corona
coronasakal media
Updated on

मुंबई: कोरोनासोबत (Corona) साथीचे आजार डोकं वर काढू लागले आहेत. एक महिना लोटला आहे, आणि मान्सूनसोबत (Monsoon) अनेक जलजन्य आणि हवेतून पसरणा-या व डायरिया, कॉलरा, डेंग्यू, टायफॉइड व इतर श्वसनविकारांसारख्या आजारांना (Breathing Deceases) फोफावू लागले आहेत. या आजारांची लक्षणे कोरोनाशी मिळतीजुळती असल्यामुळे लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.कोणताही आजार अंगावर न काढण्याचे आवाहन तज्ञ डॉक्टरांकडून (Doctors) करण्यात येत आहे. ( Monsoon various Deceases and corona symptoms same as Doctors says-nss91)

 डेंग्यूमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगावर चट्टे,अंगदुखीसारखी लक्षणे, चिकणगुण्या ताप, अंगदुखी, चट्टे, सांधेदुखी, मलेरियामध्ये ताप, घाम येणे, हुडहुडी भरणे, जुलाब ही सर्व लक्षणे व्हायरल ताप आणि कोरोनाशी मिळतीजुळती असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. जर पावसाळी आजारांचा संसर्ग झाला तर  नकळतपणे विषाणूमिश्रित पाण्याचे अगदी लहान लहान थेंब फवारले जातात ज्यांची इतरांना सहज लागण होऊ शकते. त्यामुळे, पुरेसे अंतर राखले न गेल्यास किंवा संसर्गबाधित व्यक्तीच्या खूप जवळ उभे राहिल्यास हे बॅक्टेरिया हात, तोंड किंवा नाकावाटे निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. बॅक्टेरियापासून लक्षणविरहित संसर्ग सुरू होण्यास जवळजवळ 16 ते 48 तास लागतात. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्व औषधे घ्या असेही तज्ज्ञ सांगतात.

corona
रायगड: तळई दरड दुर्घटनेत एकूण 44 जणांचा बळी; बचाव कार्य सुरुच

शासकीय नियमांचे पालन करा. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करा. महापालिकेच्या सर्व रुग्णालये पावसाळी आजारासाठी सज्ज आहेत. कोरोनाची तपासणी करण्याची गरज वाटल्यास तातडीने चाचणी करण्यात येईल.

- डॉ. रमेश भारमल, संचालक,महापालिका मुख्य रुग्णालये

-आपले घर आणि परिसर डासांपासून मुक्त ठेवा.

-डासांना परतवून लावणारी रिपेलन्ट्स वापरा आणि बाहेर पडताना संपूर्ण बाह्यांचे कपडे घाला. -विषाणूजन्य आजारांचा धोका कमी करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

-फक्त उकळलेले पाणीच प्या.

-ताजे घरगुती अन्न घ्या

-घरात हवा खेळती राहील याची काळजी घ्या.

-खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा

-हात धुतल्याशिवाय नाकाला किंवा तोंडाला स्पर्श करू नका

तब्येतीमध्ये काही बदल झालेले लक्षात आले, विशेषत: बदललेली लक्षणे दिसून आली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. यात जराही उशीर झाला तर नको असलेल्या गुंतागुंती उद्भवू शकतात असे फोर्टिस रुग्णालयाच्या संसर्गजन्य आजार विशेषज्ज्ञ डॉ. अनिता मॅथ्यू यांनी साांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()