Thane: उत्तर भारतीयांच्या हाती ओवळा- माजिवडा विधानसभेच्या विजयाचा पासवर्ड, स्थानिक भूमिपुत्र दुसऱ्या क्रमांकावर

Ovala-Majiwada Assembly constituency News | या मतदारसंघातील बरेचसे चित्र उमेदवार कोणत्या राज्यातील आहे, त्यावर अवलंबून असण्याची शक्यता आहे.
Ovala-Majiwada Assembly constituency
Thane Election Resultsesakal
Updated on

राजीव डाके : सकाळ वृत्तसेवा

Thane latest News: विधानसभेची निवडणूक जाहीर होताच सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. या निवडणुकीतील लढत थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार असली तरी ओवळा- माजिवडा विधानसभेत मात्र निवडणुकीचे चित्र वेगळे दिसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांत पहिल्या क्रमांकाचा मतदार उत्तर भारतीय असल्याने त्याची मते ज्यांच्या पारड्यात पडतील त्या उमेदवाराला विजयाची खात्री असणार आहे.

ओवळा- माजिवडा हा मतदारसंघ ठाण्यापासून थेट भाईंदरपर्यंत पोहोचला आहे. सध्या या मतदारसंघात शिवसेनेचे प्रताप सरनाईक आमदार आहेत. येथे निवडून येण्याची त्यांची तिसरी टर्म आहे. ते दोन्ही वेळा निवडून आले तेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ होती; मात्र आताचे चित्र वेगळे आहे. शिवसेनेत फूट पडल्याने दोन शिवसेना अर्थात दोन शिवसेनेचे उमेदवार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच या मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात नव्या इमारती उभ्या राहिल्याने त्यामध्ये बहुतांश मतदार ठाण्याबाहेरून येथे राहायला आला आहे. परिणामी, स्थानिक भूमिपुत्र मतदारांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.