यंदाचा थर्टीफर्स्ट साजरा करा शिस्तीत, मुंबईच्या रस्त्यांवर ३५ हजार पोलिस घालणार गस्त

यंदाचा थर्टीफर्स्ट साजरा करा शिस्तीत, मुंबईच्या रस्त्यांवर ३५ हजार पोलिस घालणार गस्त
Updated on

मुंबई : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. या बातमीने कदाचित तुमचा काहीसा मुडऑफ देखील होऊ शकतो. कारण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कठोर निर्णय घेतले गेले आहेत. रात्री ११ वाजेनंतर कोणत्याही हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी नसणार आहे. सोबतच कोरोनामुळे यंदा नाईट कर्फ्यू देखील आहे. त्यामुळे चारपेक्षा अधिकांना रात्री अकरा वाजेनंतर रस्त्यावर फिरण्यास अनुमती नाही. अशात तुम्ही जर रात्री बिल्डिंगच्या गच्चीवर यंदाचा थर्टीफर्स्ट साजरा करायच्या मूडमध्ये असाल तर जरा थांबा. कारण तुमच्या टेरेसवर काय चालू आहे, यावरही पोलिस यंदा बारीक नजर ठेवणार आहेत. 

मुंबईत ३१ तारखेला होणाऱ्या गच्चीवरील पार्ट्यांवर मुंबई पोलिसांची ड्रोनद्वारा नजर असणार आहे. त्यामुळे यंदा गच्चीत पार्टी करायचा तुमचा प्लॅन बनत असेल तर तो तात्काळ रद्द करा. कारण आता मुंबई पोलिसांचे ड्रोन आत तुमच्या गच्चीवर भिरभिरून गस्त घालणार आहेत.

३१ डिसेंबरच्या रात्री अनुचित प्रकार होऊ नयेत आणि नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करू नये यासाठी ३५ हजार पोलिस मुंबईच्या रस्त्यावर असणार आहेत. यंदा मद्यपी वाहन चालकांची ब्रेथ ऍनालायझर टेस्ट होणार नाहीये. मात्र, मद्यपी वाहन चालकांना जवळच्या रुग्णालयात नेऊन त्यांची रक्त चाचणी केली जाणार आहे. 

काय आहेत नियम : 

  • रात्री अकरा नंतर संचारबंदी लागू होईल 
  • चारपेक्षा अधिक जण एकावेळी एकत्र फिरू शकणार नाहीत. 
  • रात्री अकरा वाजेनंतर कोणतंही हॉटेल, पब, बार सुरु राहणार नाही
  • मुंबई पोलिसांची ड्रोनद्वारा गच्चीवर होणाऱ्या पार्ट्यांवर नजर राहणार आहे 
  • यंदा ११ वाजेनंतर मुंबईतील कोणत्याही चौपाट्यांवर नागरिकांना परवानगी नसेल, चारपेक्षा अधिक जण एकत्र दिसल्यास होणार कारवाई            

more than thirty five thousand police will be present on the roads of mumbai on 32st night

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.