मुंबई : शिवसेनेचे (उबाठा) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर याच्या मृत्युचा कट मॉरीसने तुरुंगात असताना तयार केला होता.जामीनावर तुरुगांतून बाहेर पडल्यावर मॉरीस सातत्याने अभिषेकला संपण्याची संधी शोधत होता. गुरुवारी त्याला ही संधी मिळाली. पोलिस तपासात ही बाब पुढे आली आहे.
सहा महिन्यांपूर्वीच जामिनावर बाहेर आल्यानंतर मॉरीसने अभिषेक घोसाळकर यांचा पुन्हा विश्वास कमावला. विश्वास बसल्यामुळे पालिका निवडणूकीत तिकिट मिळवून देण्याचे आश्वासनही अभिषेकने मॉरीसला दिले होत्याचे समजते.
मात्र या संपुर्ण काळात अभिषेकला कसे ठार करायचे याचाच विचार मॉरीस करत होता. कायम कार्यकर्त्यांच्या गर्दीत राहत असल्यामुळे अभिषेकवर हल्ला करणे शक्य नव्हते. त्यामुळे मॉरीसने अभिषेकला गुरुवारी कार्यालयात बोलावले.
हत्या करण्यासाठी मॉरीसने त्याचा मित्र असलेल्या मेहुल पारेख याला बॉडीगार्डचे पिस्तुल बाहेरच्या कॅबीनमध्ये ठेवायला सांगीतले. आतमध्ये पिस्तूल ठेवले असते तर कदाचित अभिषेकला संशय़ येण्याची शक्यता होती. पिस्तूल तिथे आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी फेसबुक लाईव्हच्या दरम्यान मॉरीस दोनदा ऑफीसच्या बाहेर आला होता.
समाजसेवक म्हणून वावरणाऱ्या मॉरीसचे सर्व पक्षासोबत चांगले संबध होते.एका महिलेसोबत लिव्ह ऍण्ड रिलेशनशीपमध्ये तो राहत होता. याच महिलेकडून त्याने ८५ लाख रुपये घेतले. तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला.
या महिलेच्या पोलिस तक्रारीनंतर मॉरीसला अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते. मॉरीसने अनेकांची आर्थिक फसवणूक केली. यातील काहींनी अभिषेक घोसाळकर यांची मदत घेतली होती. मॉरीसला कायमचे विदेशात जायचे होते.तो प्रयत्नही अभिषेकमुळे फसला.पत्नीकडे त्याने अभिषेकला संपवणार असे कित्येकदा बोलून दाखवले होते.
यापुर्वीच्या तुरुगांतील अनुभव पाहता मॉरीसला पुन्हा जेलमध्ये जायचे नव्हते. त्यामुळे अभिषेकवर अतिशय थंडपणे गोळ्या झाडल्यानंतर मॉरीसने स्वतवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यासाठी कार्यालयाच्या पोटमाळ्यावर जावून त्याने पिस्तुल रिलोड केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.