Mumbai News: मुंबईतून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बर्थडे पार्टीसाठी गेलेल्या लहान मुलांना देण्यात आलेल्या सीलबंद ऑरेंज ज्यूसच्या बाटलीत डास आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
9 सप्टेंबर रोजी जोगेश्वरी पश्चिमेकडील आदर्श नगर येथे वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत आलेल्या लहान मुलांना आयोजकांकडून बिग किड्स ऑरेंज हे पेय देण्यात आले. वैष्णवी कसाळकर नावाच्या मुलीच्या हातात आलेल्या ज्यूसच्या सीलबंद बाटलीमध्ये काहीतरी संशयास्पद दिसून आल्याने तिने आपल्या आई-वडिलांना ती ज्यूसची बाटली दाखवली.