अवघ्या साडेसात हजार फूट जागेसाठी मोजले 30 कोटी, BKC मधील सर्वात महागडं प्रॉपर्टी डिल

अवघ्या साडेसात हजार फूट जागेसाठी मोजले 30 कोटी, BKC मधील सर्वात महागडं प्रॉपर्टी डिल
Updated on

मुंबई : लॉकडाऊनचा मालमत्ता क्षेत्रालाही चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. मात्र या दरम्यान मोठ्या प्रॉपर्टी डिल सुध्दा होताना दिसताहेत. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये लॉकडाऊन दरम्यान एका महागड्या डिलची नोंद करण्यात आली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील एका कंपनीने बीकेसीत साडेसात हजार चौरस फूटाचे कार्यालय 30 कोटीत खरेदी केले आहेत. खरेदीचे प्रमाण कमी असले या कंपनीने एका चौरस फूटासाठी 40 हजार मोजले आहेत. हा हिशोब केल्यास अलिकडच्या काळातील ही सर्वात महागडी प्रॉपर्टी डिल मानली जात आहे.

गार्डीयन रियअ इस्टेट अँडवायजरी या  कंपनीने ही प्रॉपर्टी खरेदी केली आहे. कंपनीची या कॉम्प्लेक्समध्ये लिजवर घेतलेले कार्यालय होते. मात्र त्याची मुदत संपल्यामुळे कंपनीने अक्षय तृतीयेच्या दिवशी हा सौदा केला. कंपनीने यातील 70 टक्के रक्कम अदा केली असून, नवरात्रीच्या मुहुर्तावर नव्या कार्यालयात शिफ्ट होणार असल्याचे  कंपनीचे संचालक कौशल अग्रवाल यांनी म्हटले आहे.

370 हेक्टर परिसरात पसरलेले  बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स हे जागतिक वित्तीय केंद्र असून. जगातील आणि देशातील सर्व प्रमुख बँकीग,नॉन बँकीग, वित्तीय कंपन्यांचे कार्यालये इथे आहे. बँक ऑफ अमेरिका, फेसबुक, मेरील लिंच, अँमेझॉन, सिसको, सेबी, सर्व राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकींग कंपन्यांची मुख्य कार्यालये बीकेसी परिसरात आहेत. मुळातच या कॉम्प्लेक्समध्ये कुणी मालमत्ता विकत नाही. त्यामुळे हा दर योग्य असल्याचे मालमत्ता क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.

मुंबईतील महागडी खरेदी

यापुर्वी लॉकडाऊन काळातच मुंबईतल्या राहीवासी भागातील सर्वात मोठी प्रॉपर्टी डीलची नोंद करण्यात आली होती. प्रभादेवी भागात उद्योगपती निरज कोचर यांनी दोन डुप्लेक्स अपार्टमेंट 138 कोटी रुपयात खरेदी केले होते.या व्यवहाराकरीता  कोचर यांनी केवळ स्टॅम्प ड्यूटीपोटी 8.17 कोटी रुपये भरले होते.हा फ्लॅट प्रति चौरस फुट 64,879 रुपये या दराने मिळाला होता. 

मुंबईतल्या अन्य महागड्या प्रॉपर्टी डिल : 

  • निरज कोचर यांनी प्रभादेवीत दोन डुप्लेक्स अपार्टमेंटची 136.27 कोटीत खरेदी
  • निरज बजाज यांनी वरळीत 120 कोटी रुपयाला अपार्टमेंट घेतली
  • गोदरेज प्रॉपर्टीने  आर. के. स्टुडीओची जागेकरीता 250 कोटी मोजले
  • गायक अरिजीत सिंह याने वर्सोव्यात 9.1 कोटीमध्ये फ्लॅट खरेदी केला

'बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स'मधील मोठ्या डील

  • सुमीटोमो ग्रूप - 6,99,400 चौरस फूट प्लॉट, 2,238 कोटी रुपये । दर - 32,500/ चौरस फूट
  • ब्लँकस्टोन-  7,00,000 चौरस फूट जागा, 2600 कोटी रुपये । दर- 37,000/ चौरस फूट
  • व्रिहीस प्रॉपर्टी समूह - जेट एयरवेजचे दोन मजले खरेदीसाठी मोजले 490 कोटी । दर - 29,000/ चौरस फूट
  • सिटी बँक ग्रूप - 36,500 प्रति चौरस फुट या दराने 400 कोटीत प्रॉपर्टी खरेदी केली 
  • सेबी - 3 लाख चौरस फूट क्षेत्रफळ जागा 900 कोटीत खरेदी केली.

( संकलन - सुमित बागुल )

most costly deal recorded in BKC mumbai guardian real estate advisories paid 30 cr for 7000 sqft

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.