Dombivli News : धक्कादायक! अडीच वर्षाच्या आपल्या चिमुरडीचा गळा दाबून नंतर आईने उचलले टोकाचे पाऊल

अडीच वर्षाच्या आपल्या चिमुरडीचा गळा घोटून नंतर आईने देखील आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे.
mother killed her daughter first and end her life as well mumbai crime
mother killed her daughter first and end her life as well mumbai crimesakal
Updated on

डोंबिवली - अडीच वर्षाच्या आपल्या चिमुरडीचा गळा घोटून नंतर आईने देखील आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. डोंबिवली मधील रूनवाल सिटीमध्ये ही ह्रदयद्रावक घटना घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. समृद्धी सकपाळ असे लहान मुलीचे नाव असून पूजा सकपाळ (वय 29) असे मृत महिलेचे नाव आहे.

पूजा हिचा पती राहुल घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा हिने हे टोकाचे पाऊल का उचलले, ही हत्या की आत्महत्या यादिशेने पोलीस तपास करत आहेत.

कल्याण शीळ रोडवरील रूनवाल सिटी या बड्या गृहसंकुलात रविवारी ही घटना घडली. राहुल सकपाळ हे पत्नी पूजा व अडीच वर्षाची मुलगी समृद्धी यांच्यासोबत राहतात. चार वर्षांपूर्वी त्यांचे पूजा सोबत लग्न झाले होते.

रविवारी रात्री 8 च्या दरम्यान राहुल हे घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मानपाडा पोलिसांना तात्काळ याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघींचे मृतदेह ताब्यात घेत, शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी दिली. समृद्धी हिची गळा दाबून तसेच उशीने तोंड दाबुन हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पूजा हिने साडीने घरातील सिलिंग फॅनला साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पूजाने असं का केलं? हत्या आणि आत्महत्येचे काय कारण होतं? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलीस याचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.