मुंबई: कोरोनामुळे जग संकटात सापडलं आहे. जगात कोरोनाचे तब्बल ४१ लाखांपेक्षा जास्त रुग्ण रुग्ण आहेत तर २ लाख ७९ हजारांच्या वर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. मात्र यावर कुठलीही लस तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आलं नाहीये. मात्र आईच्या दुधापासून कोरोनाही अँटीबॉडी तयार केली जाऊ शकते असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
नवजात बालकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या आईच्या दुधातच तयार झालेल्या अँटीबॉडीजचा वापर केला जाऊ शकतो असं एका अभ्यासादरम्यान समोर आलं आहे. द जर्नल ऑफ क्लिनिकल माइक्रोबायोलॉजीमध्ये या संबंधीची माहिती देण्यात आली आहे.
कोरोनापासून नवजात बालकांचा बचाव करण्यासाठी आईचं दुधात असलेल्या अँटीबॉडीज उपयुक्त आहेत. त्यामुळे ज्या बाळंतीण महिलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे त्यांना त्यांच्या बाळांना स्तनपान करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
आईच्या दुधातुन कोणत्याही प्रकारचे व्हायरस बाळाच्या शरीरात जात नाहीत. त्यामुळे बाळाला आईचं अँटीबॉडीज युक्त दूध देणं हे बाळाला कोरोना व्हायरसपासून दूर ठेवेल असं 'द इकना स्कूल ऑफ मेडिसिन'च्या 'रेबेका पॉवेल' यांनी सांगितलंय.
कोरोनाची लागण झालेल्या काही बालकांमध्ये डॉक्टरांना विचित्र आणि नवीन अशी लक्षणं आढळून आलीत याला "पीडियाट्रिक मल्टी-सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम असं म्हणतात. हे लक्षणं कोरोना व्हायरसचेच आहेत आणि त्यामुळे बालकांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे विकार आढळून येत आहेत ज्यांचा परिणाम त्यांच्या शरीरावर होऊ शकतो असं डॉक्टरांकडून सांगण्यात येतंय. त्यामुळेच अँटीबॉडीजयुक्त आईचं दूधच बाळासाठी उपयुक्त आहे असं डॉक्टरांकडून सांगण्यात येतंय.
mothers milk may creates corona antibodies see what researchers are saying
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.