Ulhasnagar News : देशी बारचे लायसन्स रद्द करण्यासाठी खासदार डॉ. शिंदे नागरिकांच्या मदतीला धावले

उल्हासनगर मधील कॅम्प नंबर 2 नेहरू चौक परिसरात संतोषी माता नगरमध्ये काही मंदिरे असून त्या ठिकाणी देशी दारूचा बार सुरू करण्यात आला होता.
Ulhasnagar
UlhasnagarSakal
Updated on

उल्हासनगर - मंदिरे असलेल्या रहिवासी क्षेत्रात देशी बारचे लायसन्स देण्यात आल्याने व त्यामुळे असूरक्षितेचे वातावरण तयार झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी भाजपाचे माजी नगरसेवक राजेश वधारीया यांच्या सोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दारूच्या दरा सोबत निवेदन दिले. याची गांभीर्याने दखल घेऊन डॉ. शिंदे यांनी एक्ससाईजच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करताच एक्ससाईजने दिलेल्या देशी बारच्या लायसन्सची मान्यता रद्द केली आहे.

उल्हासनगर मधील कॅम्प नंबर 2 नेहरू चौक परिसरात संतोषी माता नगरमध्ये काही मंदिरे असून त्या ठिकाणी देशी दारूचा बार सुरू करण्यात आला होता त्यामुळे महिला, मुलांत असूरक्षितेचे वातावरण निर्माण झाले होते. ही बाब स्थानिक महिलांनी माजी नगरसेवक राजेश वधारीया यांना सांगितली.

अशातच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे एका कार्यक्रमासाठी मराठा सेक्शन मध्ये आले असता,राजेश वधारीया यांनी महिलांना सोबत घेऊन डॉ. शिंदे यांची भेट घेतली.विशेष म्हणजे महिलांनी दिलेल्या या निवेदनात 'देशी बार चालू आहे.' असा ठळकपणे उल्लेख असून देशी दारू जी.एम./टेंगो यांचे दर 35 व 70 रुपये असे नमूद आहे.

या प्रकाराची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ऑन द स्पॉट दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना फोन केल्यावर देशी बारचे लायसन्स रद्द करण्यात आल्यामुळे बारचा गाशा गुंडाळण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी आणि खास करून महिलांनी डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजेश वधारिया यांच्यामुळे आमची देशी बारच्या विळख्यातून सुटका झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.