मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (mpcb) समितीने नुकतेच मुंबई महानगरातील वायू प्रदूषणाचा (air pollution) अभ्यास करून एक अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये भविष्यात 10 वर्ष वयाच्या वाहनांना मुंबई महानगर (Mumbai) परिसरात प्रवेशबंदी (no entry) केली जाणार आहे. त्यामुळे सध्या एसटी महामंडळात (st bus corporation) सुमारे 492 बसेस 10 वर्षांवरील असून, भविष्यात कालबाह्य बसेसची संख्या वाढण्याची शक्यता आहे
महानगरात वाढती वाहन कोंडी, पार्किंग आणि अरुंद रस्त्यांमुळे मुंबई महानगरात वायू प्रदूषण वाढले आहेत्यावर नियंत्रण आणण्यासाठी एमपीसीबी विभागाने सहस्त्रबुद्धे समिती स्थापन केली होती.त्यानंतर जून महिन्यात या समितीचा अहवाल एमपीसीबीला सादर करण्यात आला आहे. यामध्ये वायू प्रदूषण रोखण्यासाठी अनेक महत्वाच्या सूचना करण्यात आल्या असून, महानगरात ट्रक टर्मिनल उभारण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहे.
त्यामध्ये 10 वर्ष जुन्या वाहनांवर सुद्धा महानगरात बंदी घातल्या जाणार आहे. त्यामुळे आधीच एसटीच्या ताफ्यात कालबाह्य बसेसची संख्या वाढली आहे. मुंबईत 41, पालघर 159 तर ठाणे विभागात 292 बसेस 10 वर्षांवरील आहे. त्यामुळे एसटीची मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
बसेसचे वय - मुंबई - पालघर - ठाणे
10 ते 10.5 - 41 - 27 - 52
10 ते 11 - ...... - 72 - 59
11 ते 11.5 - ….... - 25 - 22
11.5 ते 12 - ........ - 24 - 75
12 ते 13 - ......... - 11 - 4
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.