MSEDCL : सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे महावितरणचे आवाहन

समाज माध्यमांवर धार्मिक स्थळे आणि सामान्य नागरिक यांचे वीजदार वेगवेगळे असल्याबाबतचे संदेश समाज माध्यमात फिरत आहेत
msedcl claim social media message are fake regarding mseb electricity unit price mumbai
msedcl claim social media message are fake regarding mseb electricity unit price mumbaisakal
Updated on

मुंबई : समाज माध्यमांवर धार्मिक स्थळे आणि सामान्य नागरिक यांचे वीजदार वेगवेगळे असल्याबाबतचे संदेश समाज माध्यमात फिरत आहेत. हे संदेश दिशाभूल करणारे असल्याचा खुलासा महावितरणने केला आहे.

msedcl claim social media message are fake regarding mseb electricity unit price mumbai
MSEDCL Nandurbar News : मोबाईल नंबर अपडेट करा वीजसेवेचे SMS मिळवा!

समाज माध्यमांवर गेले काही दिवस वीजदराबाबतचा एक संदेश सर्वत्र मोठ्या प्रमाणात फिरत आहे. या संदेशात महावितरणचे वीजदर हे सामान्य नागरिक, मश्जिद, चर्च आणि मंदिरासाठी वेगवेगळे असल्याचा दावा करण्यात आला आहे. समाज माध्यमांवरील हा संदेश दिशाभुल करण्यासोबतच सामाजिक सलोख्याचे वातावरण दुषित करणारा असल्याने, अशा फसव्या संदेशाला कुणीही बळी पडू नये असे आवाहन महावितरणद्वारे करण्यात आले आहे.

msedcl claim social media message are fake regarding mseb electricity unit price mumbai
Mumbai : खुशखबर! पावसाळ्यात 'सिडको'च्या घरांचा पाऊस; 65 हजारांपेक्षा जास्त सदनिकांच्या लॉटरीचा धूमधडाका

तसेच, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या प्रकरण क्रमांक 226/2022 च्या आदेशानुसार मंदीर गुरुव्दारा, चर्च या सारख्या प्रार्थना स्थळांना व त्यांची सभागृहे, उद्याने यांची इतर कोणत्याही श्रेणीमध्ये नोंदणी नसल्यास त्यांना घरगुती ग्राहकांप्रमाणे वीजदर आकारणी करावी असे निर्देशित केले असून त्यानुसारच सर्व प्रर्थना स्थळांना वीजदर आकारणी केली जात असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. समाज माध्यमांवर अशा फसव्या संदेशांच्या माध्यमातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यापासून सावध राहाण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.