वर्सोवा- वांद्रे सामग्री सेतुला मच्छिमारांचा विरोध; सहा महिन्यांपासून काम बंद

टाटा इन्स्टिट्यूट करणार मच्छिमारांच्या समस्यांवर अभ्यास
varsova-bandra sea side
varsova-bandra sea sidesakal media
Updated on

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) माध्यमातून सुरू असलेल्या वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचे (varsova bandar sea link) काम 2.77 टक्के होऊन थांबविण्यात आले आहे. स्थानिक मच्छिमारांच्या समस्या (fish traders problems) अद्याप सुटल्या नसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून काम बंद आहे. पावसाळा असल्याने (monsoon) समुद्रात काम करणे शक्य होत नसून, मच्छिमारांच्या ज्वलंत प्रश्न सोडवण्यात एमएसआरडीसी अपयशी ठरले आहे. त्यामुळे टाटा इन्स्टिट्यूट (tata institute) मच्छिमारांच्या समस्यांवर अभ्यास करून मच्छिमारांचे प्रश्न सोडण्यात येणार आहे.

वर्सोवा वांद्रे प्रकल्पामुळे समुद्रावरील मच्छिमारीवर अवलंबून असलेल्या सुमारे 7 मच्छिमार वाड्यांचे नुकसान होणार आहे. कडेश्वरीतील मच्छिमार नागरिकांना मच्छिमारीसाठी बोटी समुद्रात सोडण्यासाठी रस्ता ठेवण्यात आला नसल्याने, मच्छिमारीवर परिणाम झाला आहे. सेतुसाठी उभारण्यात आलेल्या पुलाखालून मच्छिमारांना बोटी काढण्यासाठी बोगदा करण्यात आला मात्र, त्यामुळे मच्छिमारांच्या बोटी तुटल्या आहे. सेतूच्या कामांमध्ये मच्छिमारांची मासेमारी बंद झाली असून, उपासमारीची वेळ आली असल्याचे कडेश्वरी मत्स्यव्यवसायिक सहकारी संस्थेचे अद्यक्ष कॅमरॉन क्रॉस यांनी सांगितले आहे.

varsova-bandra sea side
मुंबईत वरिष्ठ पोलिसांकडून ऑपरेशन ऑलआऊट ; 235 गुन्हेगारांची तपासणी

2017 मध्ये या प्रकल्पासाठी 7501.43 कोटींची मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर आता सुधारित करून वांद्रे वर्सोवा प्रकल्प 11332.82 कोटींवर पोहचला आहे. तर 30 ऑगष्ट 2025 या पाच वर्षात प्रकल्प पूर्ण करायचा आहे. मात्र, अद्याप मच्छिमारांच्या समस्या सुटल्या नसल्याने सध्यातरी प्रकल्पाचे बांधकाम बंद आहे. या प्रकल्पामुळे कडेश्वरी, चिंबयी, काटर रोड, खारदांडा, जुहू कोळीवाडा, बोरेगाव, वर्सोवा येथील मच्छिमारांचे वाडे बाधित होणार आहे.

परंपरागत मच्छिमारीचा व्यवसाय केला जात आहे. वडीलानंतर आता मुलं सुद्धा समुद्रात मासेमारीसाठी जात आहे. मात्र, या पाच वर्षे चालणाऱ्या या प्रकल्पामुळे मासेमारी व्यवसाय नेहमीसाठी धोक्यात येणार आहे. शिवाय मासेमारीवर अवलंबून असलेल्या कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. त्यामुळे सर्वात आधी मच्छिमारांचे प्रश्न सरकारने ऐकणे गरजेचे आहे.

- कॅमरॉन क्रॉस, अद्यक्ष, कडेश्वरी मत्स्यव्यवसायिक सहकारी संस्थेचे

वांद्रे वर्सोवा प्रकल्पामुळे मच्छिमारांच्या जीवनमानावर त्यांच्या व्यवसायावर काय परिणाम होणार आहे. यासंदर्भात सध्या अभ्यास सुरू आहे. या प्रकल्पामुळे त्यांच्या व्यवसायाचे फायदे आणि तोट्यांचा सुद्धा विचार करून, यावर्षीच्या शेवटी यासंदर्भातील संपूर्ण अहवाल एमएसआरडीसीला सादर करण्यात येणार आहे. मार्च 2021 मध्येच यासंदर्भातील अभ्यास सुरू करण्यात आला आहे.

- डॉ.नितीन कांबळे, सोशल डेव्हलोपमेंट एक्स्पर्ट, टाटा इनसिट्यूट

varsova-bandra sea side
वारली चित्रशैलीतील रामायण राष्ट्रपती भवनात ; चित्रकलेला मिळाला राजाश्रय

प्रकल्पाला या मंडळांची मिळाली मान्यता

- महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाकडून सीआरझेड,राज्याच्या पर्यावरण विभागाची मान्यता, एमपीसीबी,भारतीय विमानतळ प्राधिकरण, वन जमिनीसाठी वन मंजुरी, उच्च न्यायालयाकडून कांदळवन छाटण्याची परवानगी, ठाणे मुख्य वनसरक्षकांकडून कांदळवन छाटून कामाची मंजुरी देण्यात आली आहे.

असा आहे प्रकल्प

- मुख्य सेतू (वांद्रा वर्सोवा) - 9.60 किमी

- वांद्रा जोडरस्ता - 1.17 किमी

- कार्टर रोड जोडरस्ता - 1.80 किमी

- जुहू कोळीवाडा - 2.80 किमी

- नाना नानी पार्क जोडरस्ता - 1.80 किमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()