Mumbai News : एसटीच्या वाहकांना मिळणार नविन तिकिट मशीन

जून महिन्यापासून वाहकांना दिलासा
msrtc ST employee get new ticket machines mumbai
msrtc ST employee get new ticket machines mumbai sakal
Updated on

मुंबई : एसटी महामंडळातील वाहकांच्या डोक्याला ताप ठरलेल्या ट्रायमॅक्स कंपनीच्या तिकिट मशीनच्या जागी आता इबिक्सकॅश या कंपनीकडून नविन इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन घेण्यात येणार आहे. येत्या जून महिन्यात या कंपनीतर्फे महामंडळाला ३४ हजार नविन मशिन पुरविण्यात येणार आहे. यामुळे वाहकांना मोठा दिलासा मिळेल.

महामंडळातील अनेक कंत्राटे घेतलेल्या वादग्रस्त ट्रायमॅक्स या कंपनीकडे राज्यातील सर्व आगारांमध्ये इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन पुरवण्याचे कंत्राट होते. परंतु अल्पावधीतच निकृष्ट दर्जाची बॅटरी, बटण काम न करणे, तिकिटांची रक्कम मशीनमध्ये दाखवणे मात्र तिकीट छपाई न होणे, चुकीचे तिकीट येणे अशा तक्रारी वाहकांकडून सुरू झाल्या.

त्यामुळे या मशिन कायम चर्चेत राहिल्या.या मशिन्स दुरुस्त करण्यासाठी एसटीने वारंवार ट्रायमॅक्स कंपनीशी संपर्क साधला परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही.दोषपूर्ण मशीनमुळे गर्दीत कोऱ्या कागदावर तिकीट लिहून देण्याची कसरत एसटी वाहकांना करावी लागते. वाहकांची हीच गैरसोय दूर करण्यासाठी महामंडळाने इबिक्सकॅश या कंपनीकडून हार्डवेअर आणि मशिन्स घेण्याबाबत नविन करार केला आहे.

निम्याहून अधिक मशीन बंद

महामंडळाच्या ताफ्यात एकूण ३८,५३३ मशीन आहेत. यापैकी ४२ टक्के अर्थात १८ हजार मशीन बंद आहेत. मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, बीड, लातूर, नांदेड, परभणी, जळगाव, अहमदनगर, वर्धा, गडचिरोली, अकोला आणि बुलढाणा या विभागांतील निम्म्याहून अधिक मशीन बंद आहेत.

तिकिट मशिनकरिता नविन कंपनीसोबत करार झाला आहे. येत्या जून महिन्यात या मशिन महामंडळाच्या वाहकाकडे येतील. यामुळे वाहकांची जी गैरसोय होत होती,ती होणार नाही.जून महिन्यात वाहकांना नविन मशिन मिळतील

- शेखर चन्ने,उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,एसटी महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.