गणेशोत्सवाच्या निमित्ताने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या परिवाराची भेट घेतली. त्यानंतर लगेचच अंबानींचे पुत्र अनंत अंबानी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती वेगाने पसरू लागली आहे. अशातच आता यावर अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं चिंता वाढली होती. मात्र रिलायन्स समूहाने हे वृत्त फेटाळलं आहे. अनंत अंबानींना कोरोनाची लागण झालेली नसल्याची माहिती या समूहाकडून देण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सध्या अंबानी यांच्या घरी नेत्यांचा, सेलिब्रिटींचा राबता आहे. रणवीर सिंग आणि दिपीका पादुकोन हेही त्यांच्या घरी गेल्याची माहिती मिळत आहे.कालच हे दोघेही मुकेश अंबानी यांच्या घरी गणेशदर्शनासाठी गेले होते. शिंदे - फडणवीस यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता याही त्यावेळी उपस्थित होत्या. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये फिरणाऱ्या या बातमीने चिंता वाढली होती. मात्र आता रिलायन्स समूहाने असं काहीही नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.