प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी यांचं घर केवळ भारतातच नाही तर परदेशातही चर्चेचा विषय आहे. लोक त्यांच्या सुंदर घराची किंमत आणि डिझाईन जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. जे साम्राज्य धीरूभाई अंबानींनी आपल्या मेहनतीने काहीवर्षापूर्वी उभं केलं होतं, त्याला आज त्यांची मुलं मुकेश आणि अनिल अंबानी यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.
करोडपती उद्योगपतींच्या यादीत मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांची नावं आहेत. आणि त्याचप्रमाणे या दोन भावांची घरंही खूप आलिशान आहेत, ज्यांच्या घरांची चर्चा केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहे. या दोन भावांच्या घरांच्या किमतीतील तफावत बऱ्यापैकी आहे, पण सौंदर्याच्या बाबतीत दोघांची घरे एकमेकांच्या घरांना मात देतात. आज अनिल अंबानींचा वाढदिवस, त्यानिमित्त जाणून घ्या...त्यांच्या घराविषयी.
मुकेश अंबानी यांचं मुंबईतलं घर १५ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलं आहे, ज्याचं नाव अँटिलिया आहे. मुकेश अंबानींचं हे घर २७ मजल्यांचे आहे, ज्यामध्ये आइस्क्रीम पार्लरपासून ते चित्रपटगृह हँगिंग गार्डनपर्यंत सर्व काही आहे. मुकेश अंबानी यांच्या घरातील ६ मजले फक्त कार पार्किंगसाठी बनवण्यात आले आहेत.
मुकेश अंबानींच्या घरात पांढरे संगमरवरी दगड बसवले आहेत. यासोबतच मुकेश अंबानींच्या या घरातील रंगापासून ते डिझाईनपर्यंत पायऱ्यांची रेलिंग आकर्षक बनवण्यात त्यांनी कोणतीही कसर केली नाही.
अनिल अंबानी यांचं मुंबईतलं घर हे देशातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. अनिल अंबानींच्या घराचे नाव 'अॅबोड' आहे ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. १६,००० स्क्वेअर फूटमध्ये बनलेल्या अनिल अंबानींच्या घरात हेलिपॅडही आहे, ५००० कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या १७ मजल्यांच्या घरासोबतच एक मोठा स्विमिंग पूल आणि जिमही बांधण्यात आले आहेत.
अनिल अंबानींच्या घराचा प्रत्येक मजला एखाद्या महालापेक्षा कमी नाही, त्यांच्या घराची गणना देशातील सर्वात उंच खाजगी इमारतींमध्ये केली जाते. त्यांचं घर बाहेरून जितकं आलिशान दिसतं तितकंच ते आतून सुंदर आहे. त्याचं घर एकापेक्षा जास्त शाही सुविधांनी भरलेले आहे.
अनिल अंबानी यांचं घर मुकेश अंबानींच्या अँटिलियाच्या तोडीचं आहे. या आलिशान घरात अनिल अंबानी त्यांची पत्नी टीना अंबानी, मुलगा जय अनमोल आणि जय अंशुल अंबानी सून क्रिशा शाह यांच्यासह राहतात. अनिल अंबानींचं घर एकापेक्षा एक सुंदर चित्रांनी भरलेलं आहे. देवाच्या चित्रांपासून ते अनेक कलात्मक चित्रांचाही त्यांच्या आलिशान घरात समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.