मुंबई- महाराष्ट्राची राजधानी मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडले होते. याप्रकरणी रविवारी एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना जैश-उल-हिंदने अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे. जैश-उल-हिंदने म्हटलंय की, पिक्चर अजून बाकी आहे. एनआयए आणि मुंबई पोलिसांची क्राईम ब्रांच यापक्ररचा तपास करत आहे.
एका टेलिग्राम मेसेजच्या माध्यमातून जैश-उल हिंदने दावा केलाय की, एसयूवीमध्ये स्फोटकं ठेवणारे दहशतावदी सुखरुपपणे घरी पोहोचले आहेत. मेसेजमध्ये पुढे म्हणण्यात आलंय की, हा केवळ ट्रेलर होतो आणि पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे. यात मुकेश अंबानी यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली आहे. तसेच पैशांची पूर्तता न केल्यास त्यांच्या मुलाच्या कारवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.
'TERROR AT AMBANI HOUSE' या शिर्षकाखालील मेसेजमध्ये दहशतवादी संघटनेने लिहिलंय की, अंबानी यांना माहितेय त्यांना काय करायचं आहे. जे पैसे देण्यास सांगितले आहेत, ते ट्रान्सफर केले जावेत आणि आपल्या फॅट किड्ससोबत आनंदाने रहावे. विशेष म्हणजे याच जैश-उल-हिंदने दिल्लीत इस्त्रायल दुतावासाबाहेर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणामागे दहशतवादी हात नसल्याचे म्हटलं होतं.
दिल्लीत 1 महिन्यापूर्वी इज्राइल एम्बेसीच्या बाहेर स्फोट घडवला होता, त्यानंतर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला होता.अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी कार ठेवल्यानंतर आता तशाच पद्धतीचा मेसेज हा सोशल मिडियावर वायरल होतं आहे. त्यामुळे या घटनेमागेही दिल्लीत स्फोट घडवणाऱ्या संघटनेचात हात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. प्रसिद्धीसठी हे कृत ही संघटना करत असल्याचेही बोलले जातेय.
काय आहे प्रकरण?
रिलायन्स ग्रुपचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ संशयास्पद स्कॉर्पिओ कार मिळली होती. त्यात जीलेटीन सापडल्यामुळे गुरूवारी एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या मदतीने ती कार हटवण्या आली. अंबानी यांच्या एन्टेलिया या घराजवळील कारमिचेल रोडवर ही हिरव्या रंगाची कार संशयीतरित्या उभी करण्यात आली होती. या कारबाबत माहिती मिळाल्यानंतर गावदेवी पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानुसार बॉम्ब शोधक व नाशक पथक घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी केलेल्या तपासणीत स्कॉर्पिओ कारमध्ये जीलेटीन हे स्फोटक सापडले. पण स्फोट घडवण्याच्या दृष्टीने हे जीलेटीन एक्लोझीव डिवाईसला जोडण्यात आले नव्हते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.