मुंबई- राज्यातील हिट अँड रनचे सत्र सुरुच आहे. वरळीमधील हिट अँड रनचं प्रकरण शांत झालं नाही तोच मुलुंडमध्ये आणखी एक अपघात घडला आहे. मुलुंडमध्ये ऑडी चालकाने दोन ऑटो रिक्षाना धडक दिली आहे. यात दोन ऑटो चालक आणि दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातामध्ये ऑटो रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ऑटो चालकाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अपघातानंतर ऑडी चालक फरार झाला आहे. मुलुंड पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. फरार ऑडी चालकाचा शोध सुरु आहे.
राज्यात हिट अँड रनची दररोज प्रकरणे समोर येत आहेत. पुण्याच्या कल्याणीनगर येथे एका पोर्शे कार चालकाने तरुण-तरुणीला उडवलं होतं. त्यानंतर त्याला जामीन देखील मिळाला होता. त्यानंतर हे प्रकरण तापलं अन् अल्पवयीन आरोपीसह त्याच्या आई-वडील, आजोबांना देखील ताब्यात घेण्यात आले. काही दिवसांपूर्नी वरळी येथे मिहीर शहाने मद्य प्राशन करून असाच अपघात केला होता. त्याने एका महिलेला चिरडले होते. त्यात महिलेचा मृत्यू झाला होता.
असे सर्व प्रकरणे ताजे असताना मुलंडमध्ये देखील हिट अँड रन घडलं आहे. धडक देऊन ऑडी चालक फरार झाला आहे. पोलिसांनी ऑडी ताब्यात घेतली आहे. अपघाताच्या फोटोंमध्ये दिसतंय की, दोन्ही ऑटोचा पार चुराडा झाला आहे. ऑडीचे देखील नुकसान झाले आहे. पोलीस फरार ऑडी चालकाचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.