Mulund Vidhansabha Election: मुलुंड या पारंपरिक मतदारसंघात प्रतिस्पर्धी पक्षांनी तुल्यबळ उमेदवार न दिल्याने यंदाची विधानसभा निवडणूक भाजपसाठी सहज सोपी ठरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना नकोशा झालेल्या पाच मतदारसंघांमध्ये मुलुंडचा समावेश आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार मिहीर कोटेचा तब्बल ५८ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते. भाजपने पुन्हा त्यांनाच संधी दिली आहे. गेल्या लढतीत मनसेने दुसऱ्या क्रमांकाची मते (३० हजार) घेतली होती. या मतदारसंघात ४५ टक्के मराठी भाषिक असूनही यंदा मनसेने येथून उमेदवार दिलेला नाही.