नितीन बिनेकर, सकाळ वृत्तसेवा
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आरमारी इतिहासात जगभरात पोहचविण्यासाठी सुवर्णदुर्ग व पद्मदुर्ग सागरी किल्ले जलमार्गाने जोडण्यात येणार आहे. या दोन किल्यावर जेट्टी उभारण्याचा प्रस्ताव सागरी महामंडळाने शासनाकडे पाठवला आला आहे.
त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासोबत जंजिरा किल्लावर जेट्टी उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून २०२४ पर्यत जेट्टीचे काम पूर्ण होणार आहे. जेट्टी उभारणीमुळे सागरी पर्यटनाला चालना मिळणार आहे.
सागरमाला उपक्रमाअंतर्गत सागरी पर्यटकांना चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून प्रयत्न केले जात आहे. पर्यटकांची मोठी वर्दळ असलेल्या जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी जेट्टी उपलब्ध नाही. त्यामुळे पर्यटकांना होडीतून किल्ल्यापर्यंत जावे लागते. पर्यटक आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होते.
हे लक्षात घेवून सागरी महामंडळाने जंजिरा किल्याचा पश्चिम दिशेला जेट्टी उभारण्याचे काम सुरु केले आहे. यासाठी अंदाजित खर्च १११ कोटी रुपये येणार आहे. सध्या जेट्टी उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. २०२४ पर्यत जेट्टी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे जंजिरा किल्लावर पर्यटक आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी सोय तर होईलच याशिवाय सागरी पर्यटकांची संख्या सुद्धा वाढणार आहे.
राज्य सरकारकडे प्रस्ताव
सुवर्णदुर्ग आणि पद्मदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी हे किल्ले बांधून घेतले होते. या दोन्ही किल्याचे वैभव व त्यांचा गौरवशाली इतिहास जगभर पोचविण्यासाठी आणि विद्यार्थाना छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराचा इतिहास अनुभवण्यासाठी सुवर्णदुर्ग आणि पद्मदुर्ग किल्यावर सागरी जेट्टी उभारण्यात येणार आहे. सुवर्णदुर्ग किल्लाच्या जेट्टीसाठी १८. १६ कोटी तर पद्मदुर्ग किल्लाच्या जेट्टीसाठी १९.९४ कोटी रुपयाचा अंदाजित खर्च आहे. या संदर्भात प्रस्ताव सागरी महामंडळाने पर्यटन महाराष्ट्र शासनाकडे पाठविला आहे.
सागरी पर्यटकांचा ओघ वाढणार
हर्णे येथील सुवर्णदुर्ग या किल्ल्यात जाण्यासाठी होडीने जावे लागते. अनेक पर्यटक होडीने या किल्ल्यात जातात; मात्र या किल्ल्याला जोडणारी जेट्टी झाल्यास पर्यटक मोठ्या संख्येने किल्ल्यात पर्यटनासाठी जातील. तर पद्मदुर्ग किल्लाला भेट देण्यासाठी मुरूड कोळीवाड्यातील एकदरा गावातून खाजगी बोटीने जावे लागते. येथे जेटी नसल्याने पाण्यातच उतरावे लागते.
विशेष म्हणजे पद्मदुर्ग किल्ला दुर्लक्षित आहे. दोन्ही किल्यावर जेट्टी उभारल्यानंतर सागरी पर्यटकांचा ओघ वाढणार असल्याचा विश्वास सागरी महामंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.