Mumbai : मुसळधार पावसातही मुंबईकरांना अखंडित वीजपुरवठा; अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने टाटा पॉवरचे यश

या धोरणात्मक उपक्रमामुळे या महत्त्वाच्या कंपोनंट्सचा पाण्यात भिजण्यापासून बचाव झाला
Mumbai
MumbaiSakal
Updated on

मुंबई - मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसात देखील मुंबईकरांना टाटा पॉवरने अखंडित वीज पुरवठा केला आहे. अनेक खोलगट भागांमध्ये पाणी साठलेले असून देखील महत्त्वाच्या साधनांची उंची वाढवून आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान तैनात करून मुंबई शहरात प्रचंड पाऊस असताना देखील वीज पुरवठ्यामध्ये खंड पडू दिलेला नाही.

Mumbai
Mumbai Metro: जिवाची मुंबई करायला मेट्रोची साथ, मुसळधार पावसात प्रवाशांमध्ये झपाट्याने वाढ

मान्सूनपूर्व तयारीत कंपनीने बोरिवली, दहिसर आणि मिरा-भाईंदर यासारख्या भागांमध्ये प्रमुख ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर्स, स्विचगियर्स, डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर्स आणि फीडर पिलर्स यांच्यासह प्रमुख कंपोनंट्सची उंची वाढवली आहे.

या धोरणात्मक उपक्रमामुळे या महत्त्वाच्या कंपोनंट्सचा पाण्यात भिजण्यापासून बचाव झाला आहे. त्यामुळे थेट तारांमार्फत कनेक्टेड असलेल्या टाटा पॉवर ग्राहकांची वीज खंडित झाली नाही.

कुर्ला, विलेपार्ले, अंधेरी, दादर आणि माटुंगा यासारख्या इतर खोलगट भागांमध्ये असून देखील, विचारपूर्वक जागा ठरवून उंचावर करण्यात आलेल्या इन्स्टॉलेशन्समुळे मुसळधार पावसात अतिशय आव्हानात्मक परिस्थिती असताना देखील नेटवर्क खंडित झाले नाही.

Mumbai
Mumbai : पाकिस्तानमधील दोघी भारतात येणार, अतुल भातखळकर यांचे प्रयत्न सफल

तर मिरा रोड, दहिसर, कुर्ला, विलेपार्ले, अंधेरी, दादर, माटुंगा यासारख्या भागांमध्ये एकूण ९३ फीडर पिलर्स आणि मिनी पिलर्सची उंची वाढवली आहे. याशिवाय १२ ग्राहक उपकेंद्रे आणि एका डिस्ट्रिब्युशन सबस्टेशनची देखील उंची वाढवून पाणी साठण्याचा परिणाम पायाभूत सोयीसुविधांवर होण्याचा धोका दूर केला आहे.

जल स्तर ओळखू शकणारे सेन्सर्स, एलओआरएवर आधारित आयओटी यासारखे विविध प्रकारचे नवे तंत्रज्ञान देखील कंपनीने स्वीकारले आहे.

ज्यामुळे स्काडा सिस्टिम, ऑटोमॅटिक पम्पिंग सिस्टिम आणि हायग्रोस्टॅट इन्स्टॉलेशन्ससाठी खर्चात बचत करून सिग्नल जनरेशन करणे सोपे होते. उपकेंद्रांमधील आर्द्रतेच्या प्रमाणावर लक्ष ठेवून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरते.

Mumbai
Mumbai Rain Update : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांचे हाल! सिग्नल बिघाड, लोकल सेवेला फटका

आमच्या ग्राहकांना विश्वसनीय वीज पुरवठा करण्याला आम्ही सर्वाधिक प्राधान्य देतो. ग्राहककेंद्री दृष्टिकोनासह आम्ही आमच्या पायाभूत सोयीसुविधांचे विपरीत हवामानापासून रक्षण करतो.

कोणत्याही आव्हानांचा सामना करण्याची क्षमता असलेल्या आमच्या नेटवर्कमुळे आम्ही सर्वाधिक आव्हानात्मक स्थितीमध्ये देखील अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करू शकतो.

- संजय बांगा, प्रेसिडेंट, टाटा पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.