Mumbai : 'बकरी ईद'निमित्त देवनार पशुवधगृहात १ लाख ६८ हजार शेळ्या मेंढ्यांची विक्री

Mumbai
Mumbai
Updated on

मुंबई - पालिकेच्‍या देवनार पशुवधगृहात बकरी ईद निमित्‍त मोठ्या संख्येने जनावरे दाखल झाली होती. त्यापैकी १ लाख ६८ हजार ४८९ शेळया - मेंढयांची व १६ हजार ३५० म्‍हैसवर्गीय जनावरांची विक्री झाली.

Mumbai
Mumbai News : मुंबईत लेप्टोमुळे पहिला मृत्यू! स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्येही वाढ

गेल्या आठवड्यात झालेल्या बकरी ईद सणानिमित्त महानगरपालिकेच्‍या देवनार पशुवधगृह परिसरात संबंधित विक्रेत्यांना जागा उपलब्ध करुन महापालिका येते. बकरी ईद सणाच्या निमित्ताने देवनार पशुवधगृहात सर्व प्रकारच्या व्यवस्थांचे चोख नियोजन करण्यात आले होते.

साधारणपणे सणाच्‍या १० ते १५ दिवस आधी हे विक्रेते देवनार पशुवधगृहात दाखल झाले होते. त्यांच्‍यासोबतच १ लाख ७७ हजार २७८ बकरे आणि १६ हजार ३५० म्‍हैसवर्गीय जनावरे दाखल झाली होती. त्‍यापैकी १ लाख ६८ हजार ४८९ शेळया - मेंढयांची व १६ हजार ३५० म्‍हैसवर्गीय जनावरांची विक्री झाली.

Mumbai
NCP Crisis: राष्ट्रवादीच्या आणखी दोन नेत्याची हाकालपट्टी; अजित पवारांसोबत गेल्यानं कारवाई

देवनार पशुवधगृहाच्‍या ६४ एकराच्‍या प्रशस्‍त जागेत 'बकरी ईद' निमित्‍त बकरे व म्‍हैशी आदी जनावरांसाठी ७७ हजार चौरस मीटर जागेवर निवारा केंद्र, मंडप उभारण्‍यात आले होते. जनावरांसाठी पाणी, चारा, प्राथमिक पशुवैदयकीय आरोग्‍य केंद्र यांची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती.

पशुवधगृहातील 'म्हैस धक्का' येथे जनावरांसाठी नवीन शेड उभारण्यात आले होते. शिवाय पूर्वीच्या शेडची देखील दुरूस्ती करण्यात आली होती, अशी माहिती पशुवध गृहांचे महाव्‍यवस्‍थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.