Mumbai: स्नॅपचॅट वापरायला वडीलांनी केला विरोध, 16 वर्षाच्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल

Latest kalyan Update: Daughter gives up on life after father not allowed to use snapchat in kalyan Mumbai
Mumbai: स्नॅपचॅट वापरायला वडीलांनी केला विरोध, 16 वर्षाच्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल
death photosakal
Updated on

SnapChat: मोबाईल मध्ये स्नॅपचॅट सुरू करू नको असे वडिलांनी तिला आधीच बजावले होते. मात्र तरीही तिने मोबाईल मध्ये ते अप्लिकेशन सुरू केले. वडिलांना ते समजल्यावर ते तिला रागे भरले.

वडील ओरडल्याचा राग अनावर झालेल्या 16 वर्षीय मुलीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आपले जीवन संपवल्याची घटना डोंबिवलीत शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Mumbai: स्नॅपचॅट वापरायला वडीलांनी केला विरोध, 16 वर्षाच्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल
Mumbai: झेडानगरमध्ये 200हून अधिक अनधिकृत झोपड्यांवर पालिकेने चालवला बुलडोझर!

डोंबिवली निळजे येथील लोढा हेवन परिसरात शुक्रवारी ही घटना घडली आहे. मोबाईल मध्ये असे ॲप ओपन करून समाज माध्यमांच्या नाहक संपर्कात राहू नको असे वडिलांनी मुलीला समजावले होते. तरीही वडिलांचे न ऐकता मुलीने स्नॅपचॅट मोबाईल मध्ये गुपचूप सुरू केले. याची माहिती वडिलांना मिळताच वडील तिला रागावले. वडिल रागावल्याने अल्पवयीन मुलीला तो राग सहन झाला नाही.

Mumbai: स्नॅपचॅट वापरायला वडीलांनी केला विरोध, 16 वर्षाच्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल
Mumbai Crime: सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवले ऑनलाइन नोकरीचे आमिष, दोन महिलांनी केली 40 लाखांची लूट

रात्री तिने आपल्या राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री उशिरा हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

Mumbai: स्नॅपचॅट वापरायला वडीलांनी केला विरोध, 16 वर्षाच्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल
Mumbai Crime: सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवले ऑनलाइन नोकरीचे आमिष, दोन महिलांनी केली 40 लाखांची लूट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.