Bhagwat Karad : पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी मुंबईला २ लाखांचे टार्गेट

पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत महाराष्ट्राला २ लाख फेरीवाल्यांना कर्ज वितरणाचे लक्ष्य मुंबईत ठेवण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली.
Bhagwat Karad
Bhagwat Karadsakal
Updated on
Summary

पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत महाराष्ट्राला २ लाख फेरीवाल्यांना कर्ज वितरणाचे लक्ष्य मुंबईत ठेवण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली.

मुंबई - पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत महाराष्ट्राला २ लाख फेरीवाल्यांना कर्ज वितरणाचे लक्ष्य मुंबईत ठेवण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात येत्या महिन्याभरात १ लाख फेरीवाल्यांना कर्ज देण्याचे उदिष असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना सुरूवातीला १० हजार रूपयांचा हप्ता वितरीत करण्याचे उदिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात कर्ज वितरीत करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील प्रयत्नशील असल्याचे कराड म्हणाले.

मुंबईतील फेरीवाल्यांची संख्या पाहता या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात लाभार्थींनी फायदा घ्यावा अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत ६० हजार फेरीवाल्यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. तर मुंबईसाठी २ लाखांचे उदिष्ट ठेवण्यात येणार आहे. महिन्याभरात आणखी एक लाख फेरीवाल्यांची भर या संख्येत पडेल असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील फळ, भाजी विक्रेत्यांपासून ते मासे विक्रेत्यांपर्यंत सर्वांना योजनेत सहभाग होता यावे हा योजनेचा उद्देश आहे. मुंबई लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ५० हजारांचे उदिष्ट देण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिका आणि बॅंकांच्या मदतीने योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया होत आहे. आधीच्या तुलनेत सध्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. तसेच एक पानी अर्ज करता येण्याचीही सुविधा आहे. पालिकेने आणि बॅंकेने या कामासाठी २४ काऊंटर्स मुंबईत खुले केले आहेत. त्यामुळे अत्यंत कमी दरामध्ये कर्ज मिळवण्याच्या सुविधेचा फेरीवाल्यांनी लाभ घ्यावा, असेही कराड म्हणाले. फेरीवाल्यांच्या आर्थिक समावेशकतेसाठी हा पुढाकार घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

फेरीवाल्यांनाही आर्थिक व्यवहारांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेची टीम वेगवेगळ्या विभागात अतिशय चोखपणे काम करत असल्याबाबतही त्यांनी कौतुक केले. फेरीवाल्यांनी नियमित कर्ज परतफेड केल्यास हे कर्ज पुढच्या काळात १० लाखांपर्यंतही घेता येऊ शकते. योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना ४ टक्के इतके व्याज आकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.