मुंबईतल्या २० वॉर्डमध्ये कशी आहे कोरोनाची स्थिती, जाणून घ्या

मुंबईतल्या २० वॉर्डमध्ये कशी आहे कोरोनाची स्थिती, जाणून घ्या
Updated on

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबई शहराला या कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मुंबईत गेल्या पाच महिन्यापासून तळ ठोकून असलेला कोरोना सध्या नियंत्रणात आला आहे.  मुंबईत २४ पैकी २० वॉर्डांमध्ये रुग्णवाढीचा दर एक टक्क्यापेक्षा कमी आहे. शहरातल्या २० प्रभागांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव कमी होत असल्याचं समजतंय. तर केवळ ४ वॉर्डमध्ये रुग्णवाढीचा दर एक टक्क्यापेक्षा अधिक आहे. 

मुंबई महापालिकेच्या २४ वॉर्डांतील कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेतला असता, केवळ चार वॉर्डांतील रुग्णवाढीची टक्केवारी एक टक्के किंवा त्याहून अधिक आहे. उर्वरित २० वॉर्डांतील रुग्णवाढीचा वेग कमी होत चालल्याचे दिसत आहे.  इतर २० वॉर्डमध्ये कोरोना संसर्ग प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. त्यापैकी सात वॉर्डमध्ये दरवाढीचा दर अर्ध्या टक्क्यापेक्षा जास्त आहे. सांताक्रूझ (एच पूर्व), अंधेरी (के पूर्व) वॉर्डात प्रत्येकी ०.५६ टक्के आणि कुर्ला (एल) वॉर्डात रुग्ण दरवाढीचा दर ०.५१ टक्के आहे.

यासोबतच दादर, धारावी भागात ०.७६ टक्के, वरळी, प्रभादेवी वॉर्डातील ०.७७ टक्के रुग्ण दरवाढ आहे. भायखळ्यातील ई वॉर्डात हे प्रमाण ०.८१ टक्के असून  भांडुप एस वॉर्डमध्ये हे प्रमाण ०.५८ टक्के आहे.

मात्र बोरीवली (आर-मध्य), ग्रँट रोड (डी), फोर्ट, चंदनवाडी (सी), वांद्रे पश्चिम (एच पश्चिम) हे परिसर असलेल्या वॉर्डांमध्ये रुग्णवाढीचा वेग थोडा जास्त असल्याचं समोर आलं आहे. 

दरम्यान मुंबई महापालिकेनं आता १० वॉर्ड्सवर लक्ष केंद्रित केलं आहे.  या १० वॉर्ड्समध्ये ४६ टक्के इतके कोरोनाचे रुग्ण आहेत. पालिका आता या १० वॉर्ड्समधल्या रुग्णांवर अधिक लक्ष देणार असल्याचं समजतंय. आजपासून या योजनेची अंमलबजावणी पालिकेकडून करण्यात येणार आहे. 

कोरोना व्हायरस प्रकरणांच्या वाढीचा दर, दुप्पट दर, सकारात्मकता दर आणि मृत्यू दराच्या आधारे या १० वॉर्ड्सची निवड करण्यात आली आहे. यात आर उत्तर (दहिसर), आर दक्षिण (कांदिवली), आर सेंट्रल (बोरिवली), एस (भांडुप), एन (घाटकोपर), टी (मुलुंड), जी उत्तर (दादर-माहीम), एम पूर्व (गोवंडी), पी उत्तर (मालाड) आणि एल (कुर्ला) या वॉर्ड्सचा समावेश आहे.

Mumbai 20 Wards current sitution of corona virus Patient Doubling Rate

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.