मुंबईः मुंबई शहर आणि उपनगरात कोसळधार सुरु असतानाच गेल्या दोन दिवसांत मुंबईत तब्बल ३६१ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. यात शहरात २८४, पूर्व उपनगरात ५० आणि पश्चिम उपनगरात ४७ ठिकाणी झाडे कोसळली. तर पावसामुळे विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक रेल्वे अधिकारी आहे. कुर्ला येथील हॉल व्हिलेज लगतच्या ग्लीप परेरा चाळीवर झाड पडले. यात जखमी झालेल्या केन डिसुजा यांना कुपर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई शहरात ४८ ठिकाणी, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ६ ठिकाणी अशा एकूण ५७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. दहिसरमध्ये आनंद नगर येथील माईल स्टोन सोसासयटीत राहणाऱ्या शंभु सोनी (३८) याचा शाँक लागून मृत्यू झाला. तर रेल्वे कर्मचारी संजीव (२२) यांचा मस्जीद बंदर येथे शाँक लागून मृत्यू झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
घरे पडल्याच्या घटना १५ ठिकाणी घडल्या असून शहरात ६ , पूर्व उपनगरात ६, पश्चिम उपनगरात ३ घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसात कमला नेहरु पार्क, पेडर रोड ते के म्स कॉनिर, मलबार हिल येथे डोंगराळ भागावरची झाडे पडून संरक्षण भिंतीचा भाग कोसळला.
१९१६ या मदत क्रमांकावर ३ हजार २०२ दूरध्वनी प्राप्त झाले. ३६१ ठिकाणी झाडे कोसळली. शॉर्टसर्किट घडू नये म्हणून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. पावसामुळे सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे शहरातील २५ ठिकाणांवरील वाहतूक ही पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली होती.
Mumbai 361 tree fall collapse two days
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.