Solar Project : महानिर्मितीचा ४.२ मेगावॅटचा सौर प्रकल्प कार्यान्वित; ४ गावांतील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोनगाव या सौर प्रकल्पामुळे नजीकच्या ४ गावांना फायदा होणार आहे.
Solar Project
Solar Projectsakal
Updated on

मुंबई - रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतीसाठी दिवसा भरवशाचा वीजपुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाने जून २०१७ मध्ये महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली. याअंतर्गत ४.२ मेगावॅटचा सोनगाव तालुका फलटण जिल्हा सातारा येथील सौर ऊर्जा प्रकल्प आज कार्यान्वित करण्यात महानिर्मितीला यश आले आहे.

सोनगाव प्रकल्पाची स्थापित क्षमता ४.२ मेगावॅट

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोनगाव या सौर प्रकल्पामुळे नजीकच्या ४ गावांना फायदा होणार आहे. सोनगाव, राजळे, साठे फाटा आणि सराडे या गावातील सुमारे १७०० कृषी वीज ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. सदर प्रकल्प महावितरणच्या ३३/२२ के.व्ही. राजळे उपकेंद्राला जोडण्यात आला आहे.

सुमारे १० हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून, प्रकल्प उभारणीचा खर्च १६ कोटी आहे. महानिर्मिती, मेसर्स ई.ई.एस.एल.(विकासक), मेसर्स टाटा (सब व्हेंडर) आहेत. आजघडीला महानिर्मितीच्या एकूण ३७१.६२ मेगावाट स्थापित क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज उत्पादन होत आहे.

या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे स्थानिक पातळीवर १० व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. सौर ऊर्जेद्वारे मिळणारी वीज सुमारे रु.३.३० प्रती युनिट दराने मिळणार असून महावितरण समवेत वीज खरेदी करार करण्यात आला आहे.

Solar Project
प्रकल्पबधितांना दिलासा! घराची किंमत २५ लाखांपेक्षा कमी तरी मिळणार 'एवढी' रक्कम

जून महिन्यात सांगली आणि कोल्हापुरातील सौर प्रकल्प कार्यान्वित होणार

आगामी जून महिन्यात महानिर्मितीचे बोर्गी (जिल्हा-सांगली) २ मेगावाट, कुंभोज (जिल्हा-कोल्हापूर) ४.४ मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. १०० मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी विकासकाला इरादा पत्र देण्यात आले आहे तसेच ४०० मेगावाटचे इरादा पत्र देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता सुमारे १ हजार मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून यासाठी महानिर्मिती युद्धपातळीवर काम करते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()