Mumbai News : मार्वे बीच लगत समुद्रात 5 मुले बुडाली.. दोघांना वाचवण्यात यश तिघांचा शोध सुरू

तिघांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. सध्या अग्निशमन दल आणि बीएमसीचे पथक बेपत्ता मुलांचा शोध घेत आहे.
mumbai 5 children drowned in sea near Marve beach searching for three child
mumbai 5 children drowned in sea near Marve beach searching for three childSakal
Updated on

मुंबई : मालाडमधील मार्वे समुद्र किनाऱ्यावर अंघोळीसाठी गेलेली पाच मुलं शनिवारी रात्री समुद्रात बुडाली. मुलांना बुडताना पाहून उपस्थित लोकांनी धाव घेत अंकुश शेवडे , कृष्णा हरिजन या दोघांना वाचवले.

मात्र शुभम जयस्वाल, निखिल कयुमकर आणि अजय हरिजन हे तीन जण बुडाले. बुडालेल्या मुलांचा शोध सुरु आहे. ही सर्व मुलं 12 ते 16 वयोगटातील आहेत. तिघांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. सध्या अग्निशमन दल आणि बीएमसीचे पथक बेपत्ता मुलांचा शोध घेत आहे.

सध्या पावसाळ्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने मुलं बुडू लागली. मुलांचा पत्ता लागत नसल्याने मार्वे बीचवर बेपत्ता मुलांसाठी हेलिकॉप्टरने शोधमोहीम सुरूच आहे.

mumbai 5 children drowned in sea near Marve beach searching for three child
Mumbai : अधिवेशन चहापान पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेता कोण ?

युद्धपातळीवर शोध सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, मार्वे समुद्राच्या किनाऱ्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. बीचवर सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत. फायर अँड रेस्क्यू टीम (FRT) शोध मोहिमेचे नेतृत्व करत आहे.

बोटी, लाइफ जॅकेट आणि इतर आवश्यक उपकरणांचा वापर करून बेपत्ता मुलांचा शोध सुरु आहे. शोध आणि बचाव कार्यात मदत म्हणून अनेक यंत्रणा सहभागी झाल्या आहेत. या यंत्रणामध्ये मुंबई महापालिकेचे अधिकारी, स्थानिक पोलीस, तटरक्षक दल, नौदल गोताखोर, 108 रुग्णवाहिका आणि वॉर्ड कर्मचारी यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.