पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्थानकात धावत्या लोकल ट्रेनमधून चढत असताना एका वृद्ध प्रवाशांचा पाय घसरल्यामुळे फलाट आणि रेल्वेच्यामध्ये अडकून फरपटत जात होता.
मुंबई - पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्थानकात धावत्या लोकल ट्रेनमधून चढत असताना एका वृद्ध प्रवाशांचा पाय घसरल्यामुळे फलाट आणि रेल्वेच्यामध्ये अडकून फरपटत जात होता. परंतु, रेल्वे जवानाने सतर्कता दाखवत वृद्ध प्रवाशाला खेचून बाहेर काढले आणि त्यांचे प्राण वाचवले. ही घटना स्थानकात लागल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे.
वसई रोड लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार रात्री ११ वाजून ३६ मिनिटांचा सुमारास विचारला जाणारी जलद लोकल वसई रोड स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर आली होती. ही लोकल आपल्या ठरलेल्या वेळेनंतर त्याच्या गंतव्य स्थानकाकडे रवाना होत होती. गाडीचा वेग वाढत असताना ७४ वर्षी विजय वसंतराव मळेकर यांनी धावत्या लोकल ट्रेन चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकल ट्रेनमध्ये चढत असताना त्या वृद्ध प्रवाशांचा पाय घसरला. रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या पोकळीत पडत असताना कर्तव्यांवर असलेल्या लोहमार्ग पोलिसांचे काँन्स्टेबल ठाणांबिर यांच्या समयसूचकता दाखवून सह प्रवाशांच्या मदतीने त्या वृद्ध प्रवाशांला ट्रेन जवळून खेचून प्राण वाचविले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरात घटना कैद-
ही संपूर्ण घटना वसई रोड रेल्वे स्थानकांवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच जीआरपी काँन्स्टेबल यांनी प्रसंगावधान दाखवत या वृद्ध प्रवाशांचे प्राण वाचवले त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.