Mumbai: मुंबईकरांचं पाणी कपातीचं टेन्शन वाढलं! धरणात ७६ दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक

Mumbai  news
Mumbai news
Updated on

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत पावसाने जोर धरला नसला तरी हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे तलावांत सध्या २,६४,६५७ दशलक्ष लिटर (१८.२९ टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा पुढील ७६ दिवस म्हणजे १९ सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका आहे.

Mumbai  news
Mumbai News : पोलीसांकडून बनावट शेअर ट्रेडिंग कंपनीचे रॅकेट उघड; 3 महिन्यात कोटीची उलाढाल

सर्वाधिक १,०८३ मिमी इतका पाऊस तुळशी तलावांत पडला असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत ३७० मिमी कमी आहे. तुळशी पाठोपाठ मोडक सागरमध्ये ९७५ मिमी, विहार - ८२९ मिमी, तानसा - ६४३ मिमी, भातसा ; ६३३ मिमी, मध्य वैतरणा - ५७० मिमी, तर अप्पर वैतरणा तलावांत ४८२ मिमी इतका सर्वात कमी पाऊस पडला आहे.

Mumbai  news
President Draupadi Murmu: महाराष्ट्र महान राज्य, यानं देशाच्या उन्नतीसाठी कार्यरत राहावं - द्रौपदी मुर्मू

मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. मात्र मुंबईसाठी संपूर्ण पावसाळा संपल्यानंतर म्हणजे १ ऑक्टोबर रोजी पुढील वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी सात तलावांत मिळून एकूण १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असणे आवश्यक असते. जून महिन्यात अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे तलावातील पाणीसाठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केली होती.

३० जून रोजीपर्यंत तलावांत १,५७,४१२ दशलक्ष लिटर म्हणजे पुढील ४० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, मुंबईत १ जुलैपासून दैनंदिन पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात लागू करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे सध्या मुंबईला दररोज ३,४६५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो.

गेल्यावर्षी ६ जून रोजी सकाळी ६ पर्यंत सात तलावांत मिळून २,३२,७४४ दशलक्ष लिटर (१६.०८ टक्के) इतका पाणीसाठा जमा होता तर यंदा ६ जून रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सात तलावांत मिळून २,६४,६५७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झालेला असून तो गेल्यावर्षीच्या पाणीसाठयापेक्षा ३१,९१३ दशलक्ष लिटरने कमी आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

सात तलावातील पाणीसाठा

तलाव पाणीसाठा

तुळशी ४,२५६

मोडकसागर ५६,९३७

विहार १०,८३९

तानसा ६०,५०७

भातसा ८१,१०८

मध्य वैतरणा ५१,०१०

उच्च वैतरणा ०

एकूण २,६४,६५७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.